बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

ओतूर - येथे सोमवारी (ता. १४) रात्री साडेअकराच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतात झोपलेला शेतमजूर जखमी झाला आहे. हनुमंत महादू जाधव (वय ५५, रा. धावशी-अहिनवेवाडी, ता. जुन्नर) हे ओतूर (ता. जुन्नर) येथील घुलेपटा परिसरात सदाशिव महादेव नलावडे यांच्या शेतात बाजरी राखण्याचे काम करतात. ते शेताच्या बाजूला पत्नी सीताबाई व दीड वर्षाचा नातू साहिल याच्यासह झोपले होते. सोमवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान बिबट्याने जाधव यांच्यावर हल्ला केला. त्यात ओठावर व तोंडावर पंजा लागल्याने ते जखमी झाली.

ओतूर - येथे सोमवारी (ता. १४) रात्री साडेअकराच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतात झोपलेला शेतमजूर जखमी झाला आहे. हनुमंत महादू जाधव (वय ५५, रा. धावशी-अहिनवेवाडी, ता. जुन्नर) हे ओतूर (ता. जुन्नर) येथील घुलेपटा परिसरात सदाशिव महादेव नलावडे यांच्या शेतात बाजरी राखण्याचे काम करतात. ते शेताच्या बाजूला पत्नी सीताबाई व दीड वर्षाचा नातू साहिल याच्यासह झोपले होते. सोमवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान बिबट्याने जाधव यांच्यावर हल्ला केला. त्यात ओठावर व तोंडावर पंजा लागल्याने ते जखमी झाली. त्या वेळी जाधव व त्यांच्या पत्नीने आरडाओरड केला, मात्र शेताजवळ वस्ती नसल्यामुळे लवकर त्यांचा आवाज ऐकू आला नाही.

Web Title: farmer injured by leopard attack