शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

Swabhimani-Shetkari-Sanghatana
Swabhimani-Shetkari-Sanghatana

पुणे - पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस आंदोलनाच्या धर्तीवर विदर्भ, मराठवाड्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शनिवारी (ता. २०) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विदर्भ, मराठवाड्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. 

बुलडाण्यात जोरदार प्रतिसाद
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला वऱ्हाडातील बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत जोरदार प्रतिसाद मिळाला. अकोला जिल्ह्यात आंदोलनाचा प्रभाव दिसत नव्हता. या भागात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात अांदोलन झाले.  

वैजापुरात ‘रास्ता रोको’
 मराठवाडा व विदर्भात दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी यासह  विविध मागण्यांसाठी सिल्लोड तालुक्‍यातील पालोद येथे चक्‍का जाम आंदोलन केले. वैजापूर तालुक्‍यातही वैजापूर-गंगापूर चौफुलीवर आंदोलन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com