शेतकऱ्यांसाठी बाजार समिती जागोजागी दरपत्रक लावणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मार्च 2019

पुणे - बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. नियमापेक्षा जास्त वसुली शेतकऱ्यांकडून केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे यापुढील काळात अडत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी बाजार समिती प्रशासनाने जागोजागी हमाली, तोलाई, वाराई आदी दरपत्रक लावली आहेत. 

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब यार्डातील काही अडत्यांनी हमाली आणि लेव्हीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कोट्यवधींची लूट केल्याचे समोर आले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर बाजार समितीने अडत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी बाजार समितीने हमाली, तोलाई,  वाराई, लेव्ही, आडत, याचे परिमाण आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्टीत किती कपात करावी, खरेदीदारांच्या पट्टीत किती कपात करावी, याबाबत बॅनर तयार केले आहेत.

गुरुवारी बंद
धूलिवंदन सणानिमित्त गुरुवारी (दि. २१) कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला बाजार, केळी बाजार व पान बाजार बंद राहणार आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस पाठवू नये, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.

Web Title: Farmer Market Committee Rate Card