जुन्नरला २२ हजार शेतकरी प्रतीक्षेत

दत्ता म्हसकर
शनिवार, 23 जून 2018

जुन्नर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जुन्नर तालुक्‍यातील ५१ हजार ६९४ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. यापैकी २९ हजार २९३ लाभार्थ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती सहायक निबंधक यशवंती मेश्राम व सहकारी अधिकारी एकनाथ माळवे यांनी दिली. 

जुन्नर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जुन्नर तालुक्‍यातील ५१ हजार ६९४ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. यापैकी २९ हजार २९३ लाभार्थ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती सहायक निबंधक यशवंती मेश्राम व सहकारी अधिकारी एकनाथ माळवे यांनी दिली. 

कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या २९ हजार २९३ लाभार्थी शेतकऱ्यांपैकी पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या १७ शाखांतील १८ हजार ६२५ सभासद असून, त्यांना ३६ कोटी ८ लक्ष ६८ हजार ८८६ रुपये रकमेची कर्जमाफी मिळाली असल्याचे जिल्हा बॅंकेचे विभागीय अधिकारी सुभाष कवडे यांनी सांगितले.
तालुक्‍यात ७६ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या असून, त्यांच्या सभासद शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकेच्या शाखामार्फत खरीप हंगामातील पीककर्जासाठी पतपुरवठा करण्यात येतो. या कर्जाची एक वर्षात परतफेड करण्याचे बंधन कर्जदार शेतकऱ्यांवर असते.

जिल्हा बॅंकेकडील माहितीनुसार तालुक्‍यातील नियमित कर्ज भरणाऱ्या १६ हजार ६३५ शेतकऱ्यांच्या खात्यांवर २५ कोटी ४५ लाख ५४ हजार ७७५ रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जमा झाली आहे. थकबाकीदार असलेल्या १ हजार ८५५ शेतकऱ्यांना ९ कोटी ५ लाख ८३ हजार ९७१ रुपयांची कर्जमाफी मिळाली असून, ही रक्कम त्याच्या खात्यावर जमा करून त्यांना पूर्ण कर्जमाफी देण्यात आली आहे. कर्जमाफीच्या १ लाख ५० हजारांच्या मर्यादेपेक्षा अधिक असणारी कर्जाची रक्कम एकरकमी भरून कर्जमाफीचा लाभ मिळालेले (ओटीएस) १३५ शेतकरी असून, त्यांना १ कोटी ५७ लाख ३० हजार १३९ रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे.

कर्जमाफीसाठी सुरवातीच्या काळात ऑनलाइन अर्ज भरण्यात अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. थकीत कर्ज प्रकरण जुने- नवे करण्याचा पद्धतीमुळे तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्याची संख्या प्रत्यक्षात खूपच कमी दिसत आहे.

कर्जमाफीमुळे तालुक्‍यातील ७६ सोसायटींच्या कर्ज वसुलीसाठी मोठी मदत झाली असून, ‘एनपीए’चे प्रमाण खाली आलेले आहे. मोठ्या कर्जदारांनीदेखील दीड लाखाचे कर्ज माफ होत असल्याने त्यावरील रक्कम भरल्याने कर्ज व व्याज वसुलीस मदत झाली आहे. खरीप हंगामातील पिकाबरोबर डाळिंब, द्राक्षे, टोमॅटोसारख्या नगदी पिकासाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ झाला आहे.

उर्वरित पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम सरकारकडून मिळणार आहे. मात्र जे सभासद कर्जमाफीसाठी पात्र नाहीत, अशा सभासदांनी कर्ज थकबाकीची रक्कम त्वरित भरून नवीन कर्ज घ्यावे व व्याजाचा भुर्दंड टाळावा.
 - सुभाष कवडे, अधिकारी, पुणे जिल्हा बॅंक

(उद्याच्या अंकात - वेल्हे)

Web Title: farmer Offline debt waiver