बारामतीत शेतकऱ्याची आत्महत्या

चिंतामणी क्षीरसागर 
शनिवार, 14 जुलै 2018

वडगाव निंबाळकर : शासनाने कर्जमाफी केली असली तरी बारामती तालुक्यात शेतकरी आत्महत्याचे सत्र थांबत नाही. शुक्रवार ता. 14 दंडवाडी येथिल शिवाजी बबन चांदगुडे वय 65 या अल्पभुधारक शेतकऱ्याने गळफास घेउन आत्महत्या केली. याबाबत येथील पोलीस पाटील गणेश चांदगुडे यांनी पोलीसांना माहीती दिली आहे.

मयत शिवाजी यांना एक मुलगा तीन विविहीत मुली आसुन दोन एकर कोरडवाहु शेत जमीन आहे. महाराष्ट्र बँकेचे 2 लाख 41 हजार रूपयांचे कर्ज आहे. गेल्या तीन चार वर्षात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी पिके हातची गेल्याने कर्जाचे हप्ते गेले नाहीत. यावर्षी सुद्धा हाती पीक येईल असे चित्र नसल्याने ते काळजीत होते. शुक्रवार ता. 13 सकाळी गावात संतराज महाराजांची पालखी येणार होती. यासाठी जातो म्हणुन ते घराबाहेर गेले.

साडेदहाच्या सुमारास गावठाण जवळ रमेश चांदगुडे यांच्या शेतातील झाडाला गळफास घेउन आत्महत्या केली. याबाबत पोलीसांना पंचनामा केला आहे. कर्जामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक आंदाज नातेवाईकांनी वर्तवला. मंडअधिकारी राहुल जगताप यांनी कर्जाबातची माहीती दिली आसुन पोलीस उपनिरिक्षक आर एन साळुंके अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Farmer Suicide in Baramati