शेतकरी महिलांनी केले सामूहिक वटपूजन  

दत्ता म्हसकर
बुधवार, 27 जून 2018

जुन्नर : जन्मोजन्मी हाच पती मिळावा असा आशीर्वाद मिळविण्यासाठी गोळेगाव ता.जुन्नर येथील महिलांनी आज बुधवार ता.27 रोजी वटवृक्षाची सामूहिक पूजा केली. गावाजवळील वडाच्या झाडाजवळ वटसावित्रीची पुजा मांडली होती. येथे गावातील महिला गटागटाने येवून पुजा करून आशीर्वाद घेऊन घरी परतत होत्या. महिलांमध्ये आज सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.

येथील सावित्रीबाई फुले महिला शेतकरी गट व डिसेंट फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील निवेदिता डावखरे-शेटे यांनी महिलांना रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. सर्पदंश प्रथमोपचार व उपचार या विषयावर डॉ. सदानंद व पल्लवी राऊत याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी महिलांना आरोग्यपुस्तिकेचे वाटप करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, उखाणे स्पर्धा तसेच वृक्षारोपण व रोप वाटपाचा कार्यक्रम झाला.

Web Title: Farmer women collective celebrate vatsavitri festival