आंदोलनामुळे करंजविहिरे येथे छावणीचे स्वरूप

Police
Police

आंबेठाण (पुणे) : करंजविहिरे (ता. खेड) येथे सुरू असणाऱ्या जॅकवेल कामाच्या ठिकाणी सुमारे 400 आंदोलक शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. 27) ठिय्या मांडला. जोपर्यंत जॅकवेल आणि जलवाहिनीचे काम बंद केले जात नाही तोपर्यंत ठिय्या चालूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांना घेतला. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

एका बाजूला सरकार काम बंद ठेवणार असे सांगते आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना विश्वासात न घेता काम सुरू करते हा विश्वासघात आहे. जोपर्यंत जॅकवेल आणि जलवाहिनीचे काम बंद केले जात नाही आणि ठरल्याप्रमाणे जे एक किलोमीटर जलवाहिनीचे काम बाकी ठेवायचे आहे त्या ठिकाणी पसरविलेले लोखंडी पाइप उचलले जात नाही तोपर्यंत ठिय्या मोडणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला.

यावेळी देविदास बांदल म्हणाले, ""ज्या वेगाने काम सुरू आहे त्या वेगाने प्रश्न सुटत नाही, अशी खंत व्यक्त करीत एक किलोमीटर अंतरात जेवढे पाइप ठेवलेत तेवढे काढावे, अशी विनंती केली. तसेच जर चर्चा होऊन देखील जर जलवाहिनी ठेकेदार एक किलोमीटरचे काम सुरू ठेवत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा.''

याप्रसंगी माजी उपसभापती बनसू होले, सत्यवान नवले, देविदास बांदल, गजानन कुडेकर, किरण चोरघे, किसन नवले, तानाजी नवले, स्वप्नील येवले, तुकाराम नवले, शांताराम शिवेंकर, तुकाराम गवारी, गणेश जाधव, मल्हारी शिवेकर, निवृत्ती नवले, संभाजी कोळेकर यांच्यासह प्रकल्पग्रस्त आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धरण परिसरात जॅकवेलचे काम सुरू ठेवण्यासाठी 17 जूनपासून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला असून सध्या 50 पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे. शुक्रवारी आंदोलक येणार असल्याने अजून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. चाकण पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस निरीक्षक कल्याण पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


सरकारकडून आमची फसवणूक होत असून मागील दीड वर्षांपासून बैठका होत नसल्याचा आरोप केला. प्रशासनाने आमच्यावर बळजबरी करू नये. तसे केल्यास कुटुंबसह पाण्यात उतरून जलसमाधी घेऊ असा इशारा दिला.
- देविदास बांदल, आंदोलक शेतकरी

संबंधित एक किलोमीटरचे काम होणार नाही. जे एक किलोमीटर अंतराचे काम बाकी ठेवायचे आहे त्याला आम्ही बंदोबस्त देणार नाही. शेतकऱ्यांनी कायदेशीर मार्गाने जावे.
- कल्याण पवार, पोलिस निरीक्षक, चाकण

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com