उजनी धरणात वाढला २६ टक्के पाणीसाठा; शेतकरी सुखावला

प्रा. प्रशांत चवरे
मंगळवार, 30 जुलै 2019

भिगवण : पुणे जिल्ह्यात व भीमा खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणात मागील तीन दिवसांपासून बंडगार्डन व दौंड येथून मोठा विसर्ग आला आहे. त्यामुळे तीन दिवसांपुर्वी वजा २६ टक्के असलेल्या पाणी साठ्यात वाढ होऊन धरण प्लसमध्ये आल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

भिगवण : पुणे जिल्ह्यात व भीमा खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणात मागील तीन दिवसांपासून बंडगार्डन व दौंड येथून मोठा विसर्ग आला आहे. त्यामुळे तीन दिवसांपुर्वी वजा २६ टक्के असलेल्या पाणी साठ्यात वाढ होऊन धरण प्लसमध्ये आल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी (ता. ३०) दुपारी बारापर्यंत उजनी धरणामध्ये प्लस ०.०७ टक्के इतका पाणीसाठा झाला होता. 

पुणे, अहमदनगर व सोलापुर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील वाढलेल्या पाणी साठ्यामुळे धरण परिसरातील शेतकरी सुखावला आहे. चालु वर्षी पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. एका बाजुला पाऊसही नाही तर दुसऱ्या बाजुला धरणातील पाण्याची स्थितीही चिंताजनक असल्यामुळे शेतकरी वर्गासह, पिण्याच्या पाणी योजनांसाठीही ही धोक्याची घंटा होती.

अखेर जुलै महिन्याच्या अंतिम टप्यात पुणे जिल्ह्यातील भिमा खोऱ्यात झालेल्या दमदार पावसांमुळे उजनी धरणातील पाण्याच्या स्थितीमध्ये बदल झाला. जुलै अखेर धरण प्लसमध्ये आल्यामुळे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. मागील वर्षी जुन अखेरच उजनी धरण प्लसमध्ये आले होते. चालु वर्षी धरण प्लसमध्ये येण्यास एक महिना उशिर झाला आहे.

तीन दिवसात २६ टक्के पाणीसाठा
उजनी धरणाची टक्केवारी शनिवारी(ता.२७) वजा २६ टक्के एवढी होती. शनिवारी दुपारपासुन उजनी धरणामध्ये विसर्गास सुरुवात झाली तर रविवारी व सोमवारी झालेल्या विसर्गामुळे पाणी साठ्यात मोठी वाढ झाली. मागील ३ दिवसात धरणात २६ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. हा विसर्ग कायम राहिल्यास धरण लवकर भरण्याची शक्यता आहे. एकूणच उजनीत पाणीसाठा वाढत असल्याने शेतकरी आनंदित झाल्याचे दिसून येत आहे. 

मंगळवारी दुपारी बारापर्यंतची धरणातील  पाणी पातळी 
एकूण पाणीपातळी -   ४९१.०४०   मीटर
एकूण पाणीसाठा  -    १८०४.८o दलघमी
उपयुक्त  साठा   - 0 १. ९९ दलघमी
टक्केवारी        -  0.१३ % टक्के
दौंड विसर्ग    -   ४४४६३ क्यूसेक
बंडगार्डन     -    २६८२३ क्यूसेक
एकूण पाणीसाठा- ६३.७३ टी.एम.टी.
उपयुक्त पाणीसाठा -o.०७
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farmers are happy due to rises in Ujani dam water storage