नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला : पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

उरुळी कांचन : मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीचा सर्वाधिक तोटा शेतकरी वर्गाला झाला, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

सोरतापवाडी (ता. हवेली) येथे आयोजित हनुमान मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. माजी मंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.

या कार्यक्रमास माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, अशोक पवार, अशोक टेकवडे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा बॅंकेचे संचालक सुरेश घुले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, हनुमान मंदिर जीर्णोद्धार समिती अध्यक्ष शशिकांत चौधरी, उपाध्यक्ष सुनील चोरघे, पुरोगामी तरुण मंडळाचे अध्यक्ष एकनाथ लोणकर, रंगनाथ चोरघे, पुरोगामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब चोरघे आदीसंह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

पवार म्हणाले, की सध्या शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. तो जगला पाहिजे त्यासाठी शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. ग्राहकालादेखील जपले पाहिजे. केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी बेरोजगार होत असल्याने पुढील काळात बेरोजगारीचा सामना करावा लागणार आहे.

सोरतापवाडी येथून जाणाऱ्या रिंगरोडसंदर्भात ते म्हणाले, की रिंगरोडला विरोध नाही; पण रिंगरोडमुळे बागायती शेती व शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व राज्य सरकारशी चर्चा करून पर्याय शोधू.
रामदास चौधरी यांनी प्रास्ताविक केले. सुनील बाबूराव चोरघे यांनी आभार मानले.

Web Title: farmers are most affected by note ban