शर्यतीत धावणाऱ्या बैलाच्या मानेवर चिखलणीचे औत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

टाकवे बुद्रुक - भंडा-याची उधळण, हलगी तुतारीचा टिपेला गेलेला निनाद, प्रेक्षकांच्या तुडूंब गर्दीने भरलेला घाट, झाली...चा उच्च स्वरात दिलेले हाक आणि त्याच वेळी जिंकण्याच्या जिद्दीने धावणारी बैलजोडी पाहून सेकंदात बसली की, चार फूट उंच उडी मारून जल्लोष करणारा बळिराजा आज शर्यतीत धावणाऱ्या बैलाच्या मानेवर चिखलणीचे औत हाकतो आहे. हा सगळा बैलगाडी शर्यत बंदीचा परिणाम दिसतोय. 

मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्यात हजारो बैलगाडा शौकीन गाडा मालक, आज बैलगाडा शर्यत सुरू होईल या आशेवर आहे. म्हणून महागाईत देखील बैलगाडा शौकीन मोठ्या हौसेने बैलाचे संगोपन करीत आहे. त्यांना खुराक द्यायला तो आतुरलेलला आहे, पण शर्यत सुरू नसल्याने त्याने महागड्या खुराकाबाबत सध्या हात अखडता घेतला आहे. 

तीन वेळेच्या गवत, पेंढा, हिरव्या घासासह बैलजोडीला शेंगदाणा पेंडीसह मका खाऊ घातला जातो. पण हा खुराक केवळ वरवरचा आहे. शर्यतीत धावणाऱ्या बैलजोडीला खारीक खोबरेसह. तुपाचा खुराक देणारे बैलगाडा मालक आहे. पण घाटात जोडी धावत नाही. म्हणून त्याने बैलांचा खुराक कमी केला पण त्याने बैलांच्या शरीरयष्टीत फरक पडला आहे. इतकेच काय, पावसाळ्यात निवांत गोठ्यात लोळून अराम करणारी बैलजोडी सध्या चिखलणीच्या कामाला जोडली आहे. 

शेतकऱ्याच्या शेतात मशागतीची अनेक कामे आहे. त्यात बैलांना अधिक कष्टाने काम करावे लागते ते, भात लावणीच्या चिखलणीच्या कामाचे. सध्या मावळ, मुळशी, खेड तालुक्याच्या पश्चिम भागात याच कामाचा जोर असल्याने शर्यतीची बैल सध्या चिखलणीला जुंपली आहे. 

Web Title: farmers are waiting for bullock cart compition