ऑनलाईन 7/12 उताऱ्यातील चूकांमुळे ओतूरला शेतकऱ्यांची धावपळ

पराग जगताप
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

ओतूर (जुन्नर) - परिसरातील शेतकऱ्यांना ऑनलाईन सात/बाऱ्याची प्रत काढल्यानतंर त्यातील चूकांमुळे धावपळ करावी लागत आहे. त्यात काही शेतकऱ्यांची 7/12 उताऱ्यातून नावेच गायब झालेली दिसतात तर काहींमध्ये चूकीची नावे समाविष्ट झाल्यामुळे त्यातील दुरुस्तीसाठी शेतकरी तलाठी काऱ्यालयात हेलपाटे मारताना दिसत आहे.

ओतूर (जुन्नर) - परिसरातील शेतकऱ्यांना ऑनलाईन सात/बाऱ्याची प्रत काढल्यानतंर त्यातील चूकांमुळे धावपळ करावी लागत आहे. त्यात काही शेतकऱ्यांची 7/12 उताऱ्यातून नावेच गायब झालेली दिसतात तर काहींमध्ये चूकीची नावे समाविष्ट झाल्यामुळे त्यातील दुरुस्तीसाठी शेतकरी तलाठी काऱ्यालयात हेलपाटे मारताना दिसत आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार महसुल विभागाने रात्रंदिवस काम करून शेतकऱ्यांचा 7/12 ऑनलाईन संगणकिकृत केला. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला 7/12 कुठेही पहाता येणे किंवा काढता येणे सोपे झाले. सातबारा उताऱ्यासाठी महाराष्ट्र शासनाने महसुल विभागाचे संकेतस्थळही तयार केले. मात्र अलीकडेच जुन्नर तालुक्यातील ओतूर व परिसरातील गावातील बऱ्याच शेतकऱ्यांची 7/12 उताऱ्यावरिल नावे गायब झाल्याने ओतूर आणि परिसरातील शेतकऱ्यांची सात बारा दुरूस्तीसाठी धावपळ सुरू झाली आहे. तर महसुल विभागाकडुन या झालेल्या चुकीची आर्थीक झळ शेतकऱ्यांनाच देणार का ? असा ही सवाल उपस्थीत होवू लागला आहे. 

ऑनलाईन 7/12 उतारा काढल्यावर अचानक त्यातून नावे कशी काय गायब झाली असा ही प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. या आधीचा हस्तलिखीत सातबारा उताराच बरा होता असाही सुर काही ओतूर व परिसरातील शेतकरी वर्गाकडुन निघत आहे. अनेक शेतकऱ्यांनी सात बारा संगणकिकृत झाल्यावर त्यांची नावे ऑनलाईन सातबारा उताऱ्यावर आहेत का , त्यात काही चूक आहे का हे पाहिले असेल. ती बरोबर असल्यास तक्रार करण्याचे कारण नाही. मात्र अचानक काही शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावरिल नावे गायब झाली आहे. तर काही शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर अन्य दुसऱ्या  व्यक्तींची नावे दाखल झाल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये सभ्रम निर्माण झाला आहे. नावे गायब झाली आता क्षेत्र बरोबर आहे का? म्हणुन शेतकऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे. 7/12 उताऱ्यावर झालेल्या चुका दुरूस्तीसाठी दिड ते दोन महिने झाले शेतकरी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. पण शेतकऱ्याच्या सात बारा दुरूस्ती कामाला मुहर्त सापडत नसल्याचे चित्र आहे.

यावर कामगार तलाठी शेतकऱ्यांना समर्पक उत्तरे न देता किंवा महसुल विभागाकडुन झालेल्या चुका मान्य न करता 7/12 उतारा दुरूस्ती कामाबद्दल टाळाटाळ करत आहेत. महसुल विभागाकडून झालेल्या चुका दूरूस्तीसाठी आर्थिक तडजोड करण्यासाठी दिरंगाई करत असल्याच्या तक्रारी येथील शेतकरी वर्ग करीत आहे.

याबाबत जुन्नर तहसिलदार हनमंत कोळेकर यांच्याशी संपर्क असता ते म्हणाले कि जुन्नर तहसिलदारपदाचा पदभार घेवुन मला एक महिना झाला असुन याबाबत कोणताही अर्ज किंवा तक्रार आली नसुन ज्या शेतकर्यांच्या सात बारा उतार्यावर इतर व्यक्तींची नावे दाखल होऊन चुका झाल्या असतील किंवा नावे गायब झाली असतील त्यांनी तहसिल कार्यालयाकडे अर्ज करावा, सर्व सात बारा उतार्यांवरील दुरुस्ती तात्काळ करण्यात येईल.

Web Title: farmers are worried for errors in satbara