'त्याने' मिळविले मोटारीच्या इंजिनचे पेटंट

farmers Boy got a patent for a car engine
farmers Boy got a patent for a car engine

पिंपरी : शिक्षण अवघे आठवी. घरातील सर्वच अशिक्षित. मात्र, काहीतरी वेगळे करण्याची धडपड स्वस्थ बसू देत नव्हती. शेतात काम करीत असताना फावल्या वेळेत त्याने इंधन व विजेची बचत करून अनोखे इंजिन कसे बनविता येईल, ही शक्कल लढविली. दुचाकी, चारचाकीमध्ये या इंजिनचा वापर करता येऊ शकतो, हे त्याने कमी कालावधीत सिद्धही केले. शिक्षित लोकांच्या सल्ल्याने त्याने त्याचे पेटंटही मिळविले. 

अक्षय धनंजय आदक असे या तरुणाचे नाव आहे. आंबेगाव तालुक्‍यातील वडगाव पीरमधील मांदळेवाडीतील तो मूळचा रहिवासी. सध्या भोसरीतील टेल्को रस्ता परिसरात राहतो. इंजिन बनविण्यासाठी काही नातेवाईक व मित्रांनी त्याला मदत केली. त्याच्या पेटंटचे नाव 'इम्प्रूव्ह परपेच्युअल मशिन इलेक्‍ट्रिसिटी जनरेशन' असे आहे. जून 2019 मध्ये हे पेटंट त्याला मिळाले आहे. 

पुणे : चंदननगरच्या गोल्ड लोन कार्यालय दरोडा प्रकरणी दोघांना अटक 

अॅटोमोबाईल क्षेत्रातील व्यवसायाला या इंजिनमुळे मोठा फायदा होणार आहे. इंधनाचे वाढते दर, आरोग्य व कचऱ्याच्या समस्या, वायुप्रदूषण यावर मात करणारा हा घटक आहे. इंजिनमध्ये 24 तास बॅटरी, कंट्रोलर, ड्रिमर, इनव्हर्टर, एसी मोटार, अर्ल्टनेटर, टायमर स्विच, चैन, ट्रान्सफॉर्मरचा वापर केलेला आहे. यामुळे पर्यावरणास कोणतीही हानी होणार नाही. शून्य प्रदूषण अशी या इंजिनची संकल्पना आहे. यासाठी कोणतेही चार्जिंग पद्धतीचा अवलंब केलेला नाही. इंजिनमध्ये बिघाड झाल्यास खर्चिक नाही ते त्वरित दुरुस्त करता येते. 

मोसंबीला अच्छे दिन;एक मोसंबी तब्बल २६ रुपयांना
 
असे आहे इंजिनचे फायदे 
- इको फ्रेंडली इंजिन 
- चार्जिंग करावे लागत नाही 
- वेळेची बचत 
- विजेची बचत 
- किलोमीटरची मर्यादा नाही 
- बॅटरी किंवा देखभाल व दुरुस्ती खर्चिक नाहीत 
- अपारंपरिक ऊर्जेचा वापर 

पुणे : मार्केटयार्डात किन्नू संत्र्यांचा हंगाम सुरू

"इंधन व वीजविरहित असलेले हे इंजिन कोणत्याही इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंशी जोडता येते. मोटार तसेच मोटार व शेतीतील अत्याधुनिक अवजारांतही याचा वापर केला जाऊ शकतो. सर्व्हिसिंग चार्जिंग मोटार म्हणूनही त्याचा वापर करता येऊ शकतो. यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अशा नवनवीन शोधासाठी तरुणांना योग्य ते व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. बाजारपेठेतही याचे मूल्य खूप आहे. मला हे इंजिन बनविण्यासाठी लाखभर रुपयांपर्यंत खर्च आला.'' 
- अक्षय आदक, संशोधक, भोसरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com