esakal | शेतकऱ्यांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार; अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

शेतकऱ्यांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार; अजित पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे (Corona) गेल्या दीड वर्षापासून सगळे जग ठप्प झाले आहे. या संकटाच्या (Crisis) काळातही केवळ शेती आणि शेतकऱ्यांमुळे (Farmer) राज्याच्या अर्थव्यवस्थेला (Economy) हातभार लागला. एवढेच नव्हे तर, कृषी क्षेत्राने राज्याची अर्थव्यवस्था सावरण्यास मोठी मदत झाल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी (ता.१६) पुण्यात बोलताना व्यक्त केले. (Farmers Contribute to the States Economy Ajit Pawar)

पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या कृषिभूषण डॉ. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी, शरद आदर्श कृषिग्राम आणि आदर्श गोपालक पुरस्कार आज पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार दिलीप मोहिते, अशोक पवार, अतुल बेनके, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, कृषी सभापती बाबूराव वायकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महिलांसाठी सक्षम करणार; यशोमती ठाकूर

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरु केलेला शेतीचा वारसा शेतकरी पुढे नेत आहेत. चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार मिळाल्याने, त्यांना आणखी हुरूप येण्यास मदत होते. कृषी क्षेत्रात डॉ. अप्पासाहेब पवार आणि राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे योगदान मोलाचे आहे. शेतकऱ्यांनी शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे. यामुळे शेतीचे उत्पादन वाढविण्यास मदत होईल. कृषी विभागाच्यावतीने ‘विकेल ते पिकेल' ही योजना राबविली जात आहे. नफ्यात शेती कशी करायची, हे शेतकऱ्यांनी शिकले पाहिजे, असा सल्ला पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.

पवार म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकऱ्यांना न्याय देणारे आणि सर्वांना विकासाच्या वाटेवर घेऊन चालणारे आहे. सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. तसेच शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने दिले जात आहे. शेतकरी वर्गाच्या कष्टाचे चीज झाले पाहिजे. शेतकऱ्यांच्या सोईसाठी फिरते पशुचिकित्सालय सुरु केली आहेत. त्यासाठी आणखी ३० ॲब्युलन्स खरेदी करण्यात येतील.देशी गाईच्या दुधाला, तुपाला, शेणाला, गोमूत्राला महत्त्व आहे.’

loading image