दौंड तालुक्यातील शेतकरी आक्रमक, पोलिसांनी केले हे आवाहन

kurkumbh
kurkumbh

कुरकुंभ (पुणे) : दौंड तालुक्यातील कुरकुंभ, जिरेगाव परिसरात रखडलेल्या मनमाड- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला विरोध नसून, संपादीत जमिनीचा शासनाने मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तरस लोकांची गैरसोय लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद न करता कायदेशीर मार्गाने लढा द्यावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले.

मनमाड- बंगळूर महामार्गाचे काम कुरकुंभ, जिरेगाव येथील शेतकऱ्यांच्या तक्रारीमुळे रखडले आहे. यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी कुरकुंभ येथे सोमवारी (ता. 14) परिसरातील शेतकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलिस व रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. 

याप्रसंगी रस्तेविकास महामंडळाचे आबासाहेब देवकाते, पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, कुरकुंभचे सरपंच राहुल भोसले, माजी उपसरपंच सुनील पवार, संजय जाधव, रशीद मुलाणी, झुंबर शितोळे, नजीर शेख आदी ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

महामार्गाचे रुंदीकरणाचे काम रखडल्याने प्रवाशी व ग्रामस्थांची गैरसोय व किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामाला विरोध न करता कायदेशीर मार्गाचा अवलंब करून नुकसान भरपाई मिळवावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक महाडिक यांनी केले. तर, शेतकरी म्हणाले, पूर्वी सात मीटर रस्ता होता, तो दहा मीटर करण्यास विरोध नाही. मात्र, जास्त संपादित करणाऱ्या जागेचे पैसे द्यावेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com