कालव्याव्दारे पाझर तलाव पाण्याने भरून घेण्याची शेतकऱ्यांची मागणी

abc.jpg
abc.jpg

वडापुरी : पुण्यातील खडकवासला, वीर, भाटघर, निरा, देवधर धरण पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. परंतु जुलै महिना संपत आला तरी इंदापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही.  त्यामुळे पाझर तलाव भरली नसल्याने येणाऱ्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार. वरकुटे खुर्द पाझर तलाव, शेटफळ हवेली पाझर तलाव, तरंगवाडी पाझर तलाव, वडापुरी पाझर तलाव तसेच सराफवाडी येथील वागळ्याच तलाव भरून घ्यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. 

यावेळी सोमनाथ वाघमोडे ,किरण बोरा, नंदकुमार रणवरे, धनंजय रणवरे, संजय रणवरे, शशिकांत शेंडे, नितीन शेंडे, पोपट शेंडे, दत्तात्रय राऊत,राजाराम तरंगेतुकाराम वाघमोडे, सचिन तरंगे, नितीन गोफणे, माऊली शिंदे, तुकाराम करे, अंकुश वाघमोडे, अनिल चितळकर, बबनराव क्षीरसागर, विष्णु मकर उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे कि नद्यांमधून हे पाणी खाली सोडण्यात आले आहे. परंतु हेच पाणी जर आधी नदीद्वारे जास्त न सोडता खडकवासला व निरा डाव्या कालव्यां मधून पाझर तलावात सोडले तर पाच गावातील पाझर तलाव पूर्ण भरता येतील.  उन्हाळ्यात याचा फायदा शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी होईल. तलाव भरून घेतल्यानंतर उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता कोठेही जाणवणार नाही असे निवेदनात म्हटले आहे. 

यावेळी पुणे पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता म्हणाले कि संजय चोपडे म्हणाले कि गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पाझर तलाव भरली जातील असे आश्वासन दिले असल्याचे तांबिले म्हणाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com