मागील वर्षींच्या नुकसानीची बळिराजाला भरपाईच मिळाली नाही ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

आधुनिक भातशेती, सेंद्रिय खतांचा वापर, पाण्याचे नियोजन व शेतीशी संबंधित इतर बाबींवर नांदोशी व सणसनगर येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, त्यांनी मागील वर्षी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. 

किरकटवाडी (पुणे) : आधुनिक भातशेती, सेंद्रिय खतांचा वापर, पाण्याचे नियोजन व शेतीशी संबंधित इतर बाबींवर नांदोशी व सणसनगर येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, त्यांनी मागील वर्षी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. 

आळंदीचे मुख्याधिकारी भूमकर यांची बदली

कृषी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांच्या शेतावरच हा उपक्रम आयोजित केला होता. उपविभागीय कृषी अधिकारी सुनील खैरनार व तालुका कृषी अधिकारी सत्यवान नऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक वैभव पवार व कृषी सहायक राजश्री वर्पे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने भात रोपांची लागवड, लागवडीनंतरची आंतरमशागत, जमिनीच्या प्रकारानुसार योग्य खतांचा वापर, सेंद्रिय खतांना प्राधान्य आदी विविध विषयांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

नांदोशी येथील शेतकरी श्रीराम कदम यांनी आपल्या व्यथा मांडल्या. सणस नगर येथील शेतकरी राहुल कोंढाळकर म्हणाले, गेल्या वर्षी संपूर्ण शेताचे नुकसान झाले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेताची पाहणी केली होती. लवकर मदत करण्याचे आश्‍वासनही देण्यात आले. पण अद्याप मदत मिळाली नाही. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पडीत होत्या त्यांना मदत मिळाली. सरकारी मदतीवरचा आमचा विश्वासच उडाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers did not get any compensation for the loss of previous years