वाढत्या तापमानामुळे सिमला मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत

राजकुमार थोरात
रविवार, 13 मे 2018

वाढत्या उन्हाचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. इंदापूर तालुक्यातील शेळगाव, निमगाव केतकी, व्याहळी परीसरामधील शेतकरी सिमला मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असतात. वाढत्या तपमानाचा फटका या शेतकऱ्यांना बसला आहे.

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यामध्ये वाढत्या तापमानामुळे सिमला मिरची उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आले असून उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होवू लागली असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

चालू वर्षी उन्हाचा पारा वाढला असून तापमान ग्रामीण भागातील तपमान ४० ते ४५ अंशावर पोचले आहे. वाढत्या उन्हाचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. इंदापूर तालुक्यातील शेळगाव, निमगाव केतकी, व्याहळी परीसरामधील शेतकरी सिमला मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असतात. वाढत्या तापमानाचा फटका या शेतकऱ्यांना बसला आहे. उन्हामुळे मिरचीची कळी गळून पडत असून उत्पादनामध्ये घट होवू लागली आहे. तसेच मिरचीला सनबर्निंग होत असून पिवळे डाग पडू लागले असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी चालू वर्षी शेडनेटमध्ये मिरचीचे उत्पादन घेतले असून त्यांना वाढत्या तापमानाचा कमी त्रास होत आहे. तसेच उघड्या वातावरणामध्ये उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी मिरचीला झाडांना साड्यांची सावली केली असून उन्हापासुन होणारे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Farmers facing issue due to increasing temperature