भूमिपुत्र शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा देताच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे मिळाले 

The farmers got money when bhumiputra shetkari sanghatna giving an indication of agitation
The farmers got money when bhumiputra shetkari sanghatna giving an indication of agitation

टाकळी ढोकेश्वर - डिसेंबर  2017 मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव येथील कांदाउत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी पाठवला होता. व्यापाऱ्याकडे सतत मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने भुमिपुत्र शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल देत शेतकऱ्यांना या रकमचे धनादेश देण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी वाशी बाजार समिती मधील व्यापाऱ्यास विकला होता सतत मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने याबाबत वाशी बाजार समितीत देखील तक्रार केली असता त्याचीही दखल घेतली गेली नाही. याबाबत संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे तक्रार केली व 8 दिवसात पैसे न मिळाल्यास तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. याची दखल वाशी म बाजार समितीचे प्रशासक सतिश सोनी यांनी घेत संबंधित व्यापाऱ्याचा गाळा जप्त करून शेतकऱ्यांना पैसे मिळुन दिले. या सर्व शेतकऱ्यांना सतिश सोनी व बाजार समितीचे सचिव अनिल चव्हाण यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले. यावेळी संतोष वाडेकर, संतोष हांडे व कांदा उत्पादक शेतकरी एकनाथ कुडेकर, बाबासाहे उंडे, बाबासाहेब मिंडे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com