'ओ साहेब, आता तुम्हीच सांगा कसं जगायचं'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

पिकांच्या नुकसानी व्यतिरिक्त बांध फुटणे, शेतातील माती वाहून जाणे आदी घटनांचेदेखील पंचनामे करण्यात येत आहेत.

जुन्नर : 'कष्टाने पिकवलेलं सोन्यासारखं पीक पावसानं नेलं असून आमच्या तोंडचा घासच हिरावून घेतला. आता तुम्हीच सांगा साहेब कसं जगायचं आम्ही,' अशा शब्दांत आपलं मनातील दु:ख हिराबाई प्रकाश खांडगे (रा. पिंपळगाव, नारायणगाव, ता. जुन्नर) या शेतकरी महिलेने विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांच्यापुढे व्यक्त केले. 

- 'बाला' रिलिज होण्याच्या एक दिवस आधी अडचणीत

जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी (ता.6) पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर हे शासकीय अधिकाऱ्यांसोबत पिंपळगाव येथे आले होते. यावेळी हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आयुक्तांपुढे व्यथा मांडत नुकसान भरपाई तातडीने देण्याची मागणी केली. 

- आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करू : शरद पवार

डॉ. म्हैसकर यांनी तालुक्यातील सावरगाव, गुंजाळवाडी, पिंपळगाव या गावांमधील नुकसानीची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसामुळे जवळपास 15 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. लवकरच नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण होईल. तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन, द्राक्षे, ज्वारी, मका, टोमॅटो या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याकरिता प्रशासनाने वस्तुनिष्ठ आणि योग्य पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

- भाजपविरहित सरकार स्थापन होणार; हालचालींना वेग

पिकांच्या नुकसानी व्यतिरिक्त बांध फुटणे, शेतातील माती वाहून जाणे आदी घटनांचेदेखील पंचनामे करण्यात येत आहेत. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब पडघलमल, निवासी नायब तहसीलदार सचिन मुंढे, गटविकास अधिकारी विकास दांगट, तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers of Pimpalgaon demanded to Divisional Commissioner Deepak Mhaisekar for compensation