खराडेवाडीत घर, विहीर व दुकानांचे पंचनामे शेतकऱ्यांनी रोखले

विजय मोरे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

उंडवडी - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर जाहिर करावा. मग रस्त्यात येत असलेली घरे, दुकाने, झाडे व विहीरी यांचे पंचनामे करावेत, तो पर्यंत कोणताही पंचनामा करु नये, अशी मागणी खराडेवाडी (ता. बारामती) येथे आज (ता. 21) मंगळवारी पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी केली. यामुळे अधिकाऱ्यांना पंचनामे न करताच माघारी परतावे लागले. 

बारामती - पाटस संत तुकाराम महाराज या प्रस्तावित महामार्गाची मोजणी पूर्ण झाली असून हद्दीही निश्‍चित करण्यात आल्या आहेत. सध्या हद्दीमध्ये येणाऱ्या इमारती, विहिरी, पाइपलाईनचे व झाडांचे पंचानामे करण्याचे काम सुरु आहे.

आज (ता. 21) रोजी मंगळवारी सकाळी अकरा वाजता या रस्त्यावरील खराडेवाडी येथे नव्याने होत असलेल्या रस्त्यात येत असलेली घरे, झाडे व विहीरींचे पंचनामे करण्यासाठी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी आले होते. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे शाखेचे भूसंपादन अधिकारी डि. डि. साळुंके, वरिष्ठ अभियंता जी. पी. सुर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता एच एस म्हस्के, मंडल अधिकारी राहुल जगताप, गावकामगार तलाठी एस एल इंगुले, कृषी अधिकारी एम. जे. दोशी आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

यावेळी येथील सरपंच दत्तात्रेय खराडे, उंडवडी सुपेचे सरपंच एकनाथ जगताप, उपसरपंच पोपट गवळी, ग्रामपंचायत सदस्य गजानन भापकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय गवळी यांच्यासह शेतकऱ्यांनी पंचनाम्याच्या कामाला तीव्र विरोध करुन पंचनाम्याचे काम बंद पाडले. 

यावेळी खराडेवाडी व उंडवडी सुपे हद्दीत शेतक-यांच्या विहिरी, घरे, दुकाने, फळझाडे, बोअर, जागा रस्त्यात किती जाणार व त्याला किती मोबदला देणार हे अगोदर प्रशासनाने स्पष्ट करावे. मग पंचनामे करावेत. अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने अधिकाऱ्यांना पंचनामे न करताच माघारी परत जावे लागले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers stopped the FIR of Vihir and shops in Kharadevadi