लासुर्णेमध्ये शेतकऱ्यांनी पंचनाम्याचे काम बंद पाडले

राजकुमार थोरात
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

वालचंदनगर (पुणे) : नव्याने होणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गालगच्या इमारत, झाडांचे पंचानामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी व नागरिकांनी विरोध केला असून भूसंपादनाच्या जागेचा व नुकसानभरपाईचा दर निश्‍चित केल्याशिवाय पंचानामे करुन न देण्याचा निर्णय घेतला आहे.

आज शनिवारी (ता. 18) नॅशनल हायवे अॅथोरटी, महसुल विभागाचे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये  बारामती-इंदापूर राज्यमार्गालगतच्या लासुर्णे व जंक्शन परीसरातील शेतकरी व नागरिकांना पूर्वकल्पना न देता रस्त्यालगतच्या झाडे, इमारती, विहिरी, पाइपलाईनचे पंचानामे सुरु केले होते. पंचनामे सुरु असल्याची माहिती शेतकऱ्यांना व नागरिकांना मिळाल्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जंक्शनच्या सरपंच राजकुमार भोसले यांच्यासह स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी नागरिकांनी पंचनाम्याचे काम बंद पाडले.

भूसंपादन व नुकसानभरपाईचा दर निश्‍चित झाल्याशिवाय पंचनामे करुन न देण्याची भूमिका घेतली. यासंदर्भात मंडलधिकारी गिरीश संदीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.  यावेळी जंक्शनचे सरपंच राजकुमार भोसले, तंटामुक्त अध्यक्ष रामेश्वर माने, उपसरपंच फिरोज सय्यद, प्रदिप शिंदे, निलेश पाटील, सागर पाटील, उद्योजक लालासाहेब सपकळ,चंद्रकांत पवार उपस्थित होते.

Web Title: farmers stopped working of panchnama