ऑनलाइन डाळिंब विक्रीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

मार्केट यार्ड - बाजार समितीने डाळिंब यार्डात डाळिंबाचे ऑनलाइन लिलाव सुरू केले आहेत; परंतु ऑनलाइनच्या तुलनेत पारंपरिक लिलावात डाळिंबाला भाव जास्त मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाइन लिलावास विरोध केला आहे. दरम्यान, बाजार समितीने शंभर टक्के डाळिंबांची विक्री ऑनलाइन केली जाणार असल्याचे सांगितले. तर ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन विक्री केली नाही, त्यांच्या फळांचे काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला असून, शेतकरी संतप्त झाले आहेत.

दरम्यान, लिलाव पाहण्यासाठी येत्या सोमवारी आणि मंगळवारी केंद्रीय पथक बाजार समितीला भेट देणार आहे. समितीमध्ये कांदा, बटाटा आणि डाळिंबाचा राष्ट्रीय कृषी बाजार योजनेअंतर्गत (ई-नाम) ऑनलाइन लिलावाच्या सूचना पणन संचालकांनी यापूर्वीच बाजार समितीला दिल्या होत्या. त्यानुसार समितीने डाळिंबासह कांदा, बटाट्याचा समावेश केला असून, पहिल्या टप्प्यात डाळिंबाची निवड केली आहे. 

बाजार आवारात ई-नाम योजनेअंतर्गत डाळिंबाची विक्री अनिवार्य करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेला विरोध करणे चुकीचे आहे.
- बी. जे. देशमुख, सचिव, बाजार समिती, पुणे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers strongly oppose online pomegranate sales