पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

collector office pune
collector office pune

पुणे : भूसंपादनाचा मोबदला मिळत नसल्यामुळे दौंड तालुक्‍यातील धनाजी गेनबा धुमाळ या धरणग्रस्त शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील रेलिंगवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्‍कादायक घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या वेळी तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनी धुमाळ यांना ओढून बाहेर काढले. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनाजी धुमाळ हे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. 1958 मध्ये त्यांच्यासह काही शेतकऱ्यांच्या जमिनी धरणासाठी संपादित करण्यात आल्या होत्या. या धरणग्रस्त शेतकऱ्यांचे तीन वर्षांनंतर दौंड तालुक्‍यातील सोनवडी गावात पुनर्वसन करण्यात आले आहे. परंतु त्यांना निवासासाठी दिलेले भूखंड त्यांच्या नावावर झालेले नाहीत. त्यावर लाल शेरा मारण्यात आला आहे. त्यामुळे धरणग्रस्तांच्या या प्रश्नावर आंदोलन करण्यात येत आहे. कागदपत्रांची पूर्तता करूनही जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे धुमाळ यांनी पाचव्या मजल्यावरील रेलिंगवर चढून दोरीने बांधलेल्या जाळीवर उतरण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, ''धरणग्रस्तांच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. यातील 29 धरणग्रस्तांपैकी 25 जणांचा मृत्यू झाला आहे. न्याय हक्‍कासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न आम्ही प्रयत्न करीत आहोत. पण कार्यवाही केली जात नाही.'', अशी खंत धुमाळ यांनी व्यक्‍त केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com