राज्यपालांना शेतकरी करणार नुकसान भरपाईची रक्कम परत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

राज्यपालांनी शेतकऱ्यांना एकरी तीन हजार 200 रुपये म्हणजेच प्रति गुंठा 80 रुपये अशी अतिशय तुटपुंजी नुकसान भरपाईची मदत जाहीर केली आहे.  त्यामुळे शेतकरीवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. 

मंचर (पुणे) : राज्यपालांनी शेतकऱ्यांना एकरी तीन हजार 200 रुपये म्हणजेच प्रति गुंठा 80 रुपये अशी अतिशय तुटपुंजी नुकसान भरपाईची मदत जाहीर केली आहे. त्यातून बियाण्यांचाही खर्च भागणार नाही. त्यामुळे शेतकरीवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. 

आंबेगाव तालुक्‍यातील शेतकरी ही मदतीची रक्कम नाकारणार असून मनिऑर्डरद्वारे ही रक्कम राज्यपाल यांना परत करणार आहेत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी सांगितले. 

"आंबेगाव तालुक्‍यात भात, नाचणी, वरई, कांदा, बटाटा, लसून व तरकारी माल पूर्णपणे वाया गेला आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना केंद्र सरकारचा एकही मंत्री व अधिकारी नुकसानीची पाहणी करण्यासाठी आला नाही. यावरूनच सत्तेत असलेल्या भाजप सरकारची शेतकऱ्यांबाबत असलेली भावना लक्षात येते. त्वरित शेतकऱ्यांना सरसगट 50 हजार रुपये मदत मिळावी, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील,' असा इशारा बांगर यांनी दिला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers will pay compensation to the governor