Dr.-Pramod-Kale
Dr.-Pramod-Kale

भविष्यात अवकाशात शेती फुलणार - डॉ. काळे

पाषाण - ‘गेल्या काही वर्षांत सुरू असलेल्या संशोधनाच्या माध्यमातून अवकाशासंदर्भात अनेक बाबी उलगडल्या असून, नजीकच्या भविष्यात अवकाशात शेतीही पिकवता येणार आहे. उद्योगाच्या अनेक संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे संशोधन मोलाचे ठरणार आहे,’’ असे मत इस्रोचे स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे माजी संचालक डॉ. प्रमोद काळे यांनी व्यक्त केले. 

नवीन पिढीला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे जग समजावे, या हेतूने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) येथे पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने ‘क्रेझी अबाऊट सायन्स अँड टेक्‍नोलॉजी’ या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तिच्या उद्‌घाटन प्रसंगी ‘भविष्यातील अवकाश’ या विषयावर डॉ. काळे बोलत होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे विश्‍वस्त रवी पंडित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पीआयसीच्या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. अमिताव मलिक, मानद संचालक प्रशांत गिरबने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आदी उपस्थित होते. डॉ. काळे म्हणाले, ‘‘तंत्रज्ञानाच्या जोरावर यापुढे उपग्रह दुरुस्ती, उपग्रहांमध्ये इंधन भरणे, लेझरच्या मदतीने अवकाश कचऱ्याची सफाई करणे, स्पेस कॅप्सूलची रचना, अवकाशयान दुसऱ्या ग्रहावर उतरत असताना इंधनासाठी सोलर सेलचा वापर, अवकाशात भाज्या आणि धान्ये उत्पादित करणे, अवकाश पर्यटन आदी उद्योग संधी उपलब्ध होणार आहेत.’’ 

अवकाशात लहान व हलके उपग्रह सोडणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे झाले आहे. विद्यार्थ्यांना यामध्ये करियरच्या संधी उपलब्ध आहेत. अवकाश विमा, अवकाश संधी कायदे, पाण्याच्या अस्तित्वाचे संशोधन या गोष्टी करियरच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. 
- डॉ. प्रमोद काळे, माजी संचालक, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, इस्रो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com