एमआयटीत फॅशन शोचे आयोजन

जनार्दन दांडगे
गुरुवार, 10 मे 2018

येथील एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी (एडीटी) विद्यापीठाच्या एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन्स शाखेतर्फे 'तिसर्‍या ग्रॅज्युएशन फॅशन शो'चे आयोजन करण्यात आले. पुणे येथील हॉटेल हयात येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुपर मॉडेलच्या रैम्प वॉकने या सोहळ्याची सांगता बुधवारी (ता. ९) झाली.

लोणी काळभोर (पुणे) - येथील एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी (एडीटी) विद्यापीठाच्या एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन्स शाखेतर्फे 'तिसर्‍या ग्रॅज्युएशन फॅशन शो'चे आयोजन करण्यात आले. पुणे येथील हॉटेल हयात येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुपर मॉडेलच्या रैम्प वॉकने या सोहळ्याची सांगता बुधवारी (ता. ९) झाली.

एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनच्या विद्यार्थ्यांनी फॅशन शो मधील सहभागी स्पर्धकांचा पोशाख तयार केला होता. कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका सुनीता कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, कुलसचिव डॉ. महेश देशपांडे, एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन्सचे अधिष्ठाता आनंद चक्रदेव, संचालक धिम्मंत पांचाळ, सहाय्यक अधिष्ठाता विनायक कुलकर्णी, फॅशन विभागाच्या प्रमुख आर्शिया कपूर, प्रगती सिन्हा आणि मेथली गोयल उपस्थित होत्या.

धिम्मंत पांचाळ  यावेळी म्हणाले की,"एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन्सच्या पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा फॅशन शो अत्यंत प्रेरित, शोध आणि प्रायोगिक रचनांचे संकलन करण्यासाठी महत्वाचा ठरला आहे.  या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन दृष्टीकोन मिळाला आहे. आधुनिक फॅशन डिझाइनच्या विद्यमान सीमांच्या पलीकडे असलेल्या नवीन ट्रेंडमध्ये या शो चे सादरीकरण झाले."

Web Title: Fashion show organized in MIT