फॅशनच्या ट्रेंडचा वापर होतोय शरीरावरील डाग लपविण्यासाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tatoo

मला आजही आठवते माझ्या आजीच्या कपाळ आणि हातावरील ते गोंदण. लहानपणी याचे खूप नवल वाटत होते, पण आता या गोष्टी फॅशन म्हणून ट्रेंड ठरत आहेत.

फॅशनच्या ट्रेंडचा वापर होतोय शरीरावरील डाग लपविण्यासाठी

पुणे - मला आजही आठवते माझ्या आजीच्या कपाळ आणि हातावरील ते गोंदण. लहानपणी याचे खूप नवल वाटत होते, पण आता या गोष्टी फॅशन म्हणून ट्रेंड ठरत आहेत. एकेकाळी गोंदण करत शरीरावर निरनिराळ्या गोष्टी साकारल्या जात होत्या. काळानुसार यात बदल होत गेला आणि टॅटू हा प्रकार फॅशन म्हणून पुढे येऊ लागला. टॅटूची क्रेझ हल्ली सर्व वयोगटात पाहायला मिळते. मात्र आता हे फक्त फॅशन म्हणून न राहता काहींसाठी शरीरावरील डाग लपविण्याचा एक उत्तम पर्याय देखील ठरत आहे. अशी माहिती टॅटू आर्टिस्ट राजेश मांढरे यांनी दिली.

कोणी आपल्या जन्माची तारीख, नावाचे अक्षरे, लहान मोठे वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन अशा एक न अनेक प्रकारचे टॅटू सध्या काढले जात आहेत. टॅटू हा प्रकार पूर्वीच्या काळापासून पाहायला मिळत आहे. तेव्हा मात्र त्याचे स्वरूप वेगळे होते. सध्याची तरुणाई टॅटूचा हाच ट्रेंड हटके स्वरूपात फॉलो करताना दिसते. मात्र काळानुसार टॅटूची गरज आता बदलली आहे. गंभीर अपघातामुळे शरीरावर पडलेल्या जखमेची, शस्त्रक्रियेचे, भाजल्यामुळे शरीरावरील छोटे-मोठे दाग अनेकदा नकोशी वाटतात. ते घालविणे शक्य नसले तरी त्यांना लपविणे मात्र शक्य आहे. त्यासाठी टॅटू हा पर्याय निवडला जात आहे. असे असले तरी अशा प्रकारच्या टॅटूला साकारताना विशेष खबरदारी घेतली जाते. टॅटूमुळे त्या भागावर कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी टॅटू काढल्यानंतर कशी व कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली जाते. असेही मांढरे यांनी सांगितले.

याबाबत २३ वर्षीय तरुणी अनघा चंद्रन म्हणाली, ‘एका अपघातात माझ्या हाताला दुखापत झाली. अपघातामुळे शस्त्रक्रिया केल्याने हातावर काही ठिकाणी टाक्यांच्या दाग राहिले. लोकांना हे दाग दिसतील याची एक चिंता कायम मनात असायची. त्यामुळे लांब बाह्यांचे कपडे घालण्या शिवाय पर्याय नव्हता. सोशल मीडियावर अनेकदा टॅटूद्वारे असे दाग लपवण्यात येत असल्याचे व्हिडिओ मी पाहिले आणि मी ही टॅटू काढण्याचे ठरविले. टॅटूमुळे हा दाग पूर्णपणे झाकला गेला आहे. त्यामुळे आता ते लपवण्याची ही गरज भासत नाही.’

अलीकडे शस्त्रक्रिया, अपघात अशा विविध कारणांमुळे शरीरावर असलेले जखमेचे डाग लपविण्यासाठी टॅटू काढले जात आहेत. जखमांच्या डागांमुळे लग्न जुळण्यास अडचणी येऊ नये यासाठी बऱ्याचदा तरुण मुले-मुली टॅटूद्वारे हे दाग कायमस्वरूपी झाकण्याचा पर्याय निवडतात. महत्त्वाचे म्‍हणजेच टॅटूद्वारे हे डाग अत्यंत सहजपणे लपविले जातात. त्यामुळे त्या व्यक्तीमध्ये एक नवीन आत्मविश्‍वास देखील निर्माण होतो.’

- आतिश परदेशी, टॅटू आर्टिस्ट

टक्कल झाकण्यासाठी देखील टॅटू -

केस गळणे ही समस्या आता प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला जाणवते. तर कित्येक पुरुषांना अत्यंत कमी वयात टक्कल पडते. हेअर ट्रान्सप्लांट किंवा इतर उपचार प्रणाली ऐवजी टॅटूचा पर्याय निवडला जातो. यामध्ये डोक्यावर बारीक-बारीक डॉट्स काढून ‘ट्रीम हेअर’चा लुक भासविण्याचा प्रयत्‍न केला जातो. त्यामुळे टक्कल झाकल्याने अशा व्यक्तींना मनसोक्तपणे वावरण्याचा आत्मविश्‍वास देखील मिळतो. असे ही टॅटू आर्टिस्ट्सने नमूद केले.

Web Title: Fashion Trend Use Hide Blemishes On The Body Tatoo

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Fashiontrendbody