आत टोल नाक्यावर थांबण्याची गरज नाही

Tollnaka
Tollnaka

खेड-शिवापूर (पुणे) : टोल नाक्‍यांवर प्रवाशांचा वेळ वाया जाऊ नये; यासाठी "फासटॅग' यंत्रणा अधिक गतिमान करण्यात येणार आहे. 1 डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल नाक्‍यांवरील सर्व मार्गिकांमधून इलेक्‍ट्रॉनिक टोल कलेक्‍शन (ईटीसी) पद्धतीने टोल वसुली करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी आपल्या वाहनांना "फासटॅग' बसवून घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे.
महामार्गावर टोल नाक्‍यांवर वाहनांच्या कायमच रांगा लागलेल्या असतात. त्यात प्रवाशांचा जास्त वेळ वाया जातो. या पार्श्वभूमीवर टोल नाक्‍यावर टोलचे पैसे देऊन पावती घेणे, यात वेळ वाया जाऊ नये, यासाठी काही वर्षांपूर्वी टोल नाक्‍यांवर "फासटॅग' यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. त्यासाठी टोल नाक्‍यावर मोजक्‍या "ईटीसी' मार्गिका ठेवण्यात आल्या होत्या. मात्र "फासटॅग' वापरणाऱ्या वाहनांचे प्रमाण कमी असल्याने टोल नाक्‍यावरील वाहतूक कोंडीत फारसा फरक पडला नाही. तसेच टोल नाक्‍यावर ईटीसी लेन शोधताना वाहन चालकांचा गोंधळ उडत होता. किंवा ईटीसी लेनमध्ये इतर वाहने आल्यास फासटॅग असलेल्या वाहनांनाही रांगेत अडकून पडावे लागत होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल नाक्‍यांवरील सर्व मार्गिका ईटीसी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये "फासटॅग' वापराविषयी जनजागृती होणार आहे. शिवाय त्यामुळे फासटॅग असलेल्या वाहनांचा टोल नाक्‍यावर वेळ वाया जाणार नाही.

"फासटॅग' कसे काम करते?

  •  वाहनांच्या समोरील काचेवर बसविलेली इलेक्‍ट्रॉनिक चीप
  •  टोल नाक्‍यावर वाहन आल्यास फासटॅग चीप स्कॅन होऊन त्यातील टोलचे पैसे वजा होतात
  •  फासटॅग असलेल्या वाहनांना लेनमध्ये थांबावे लागत नाही
  •  फासटॅग सर्व टोल नाक्‍यांवर उपलब्ध
  •  फासटॅग ऑनलाइन रिचार्ज करण्याची सुविधा

सध्या "एनएचएआय'च्या टोल नाक्‍यांवर हळू-हळू ईटीसी मार्गिकांची संख्या वाढविण्यात येत आहे. 1 डिसेंबरपासून टोल नाक्‍यावरील सर्व मार्गिका ईटीसी करण्यात येणार आहेत. तर रोख स्वरूपातील टोलसाठी फक्त दोन मार्गिका असतील. ईटीसी मार्गिकांची संख्या वाढल्याने "फासटॅग' असणाऱ्या वाहनांची संख्या वाढेल आणि टोल नाक्‍यावरील गर्दीही कमी होईल. त्यासाठी नागरिकांनीही आपल्या वाहनांना "फासटॅग' बसवावा.
- सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com