एमआयटीत शिवाजी महाराजांचा पुतळा न बसविल्याने उपोषण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

लोणी काळभोर : येथील एमआयटी या शिक्षण संस्थेच्या जगविख्यात घुमटामध्ये (डोम) 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचा पुतळा उभारण्यास संस्था चालढकल करत असलेच्या निषेधार्थ, 'छत्रपती शिवराय सन्मान कृती समिती'च्या वतीने मंकर सक्रांतीच्या निमित्ताने मंगळवार (ता. 15) पासुन संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ बेमुदत चक्री उपोषन सुरु करण्यात आले आहे. 

लोणी काळभोर : येथील एमआयटी या शिक्षण संस्थेच्या जगविख्यात घुमटामध्ये (डोम) 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचा पुतळा उभारण्यास संस्था चालढकल करत असलेच्या निषेधार्थ, 'छत्रपती शिवराय सन्मान कृती समिती'च्या वतीने मंकर सक्रांतीच्या निमित्ताने मंगळवार (ता. 15) पासुन संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ बेमुदत चक्री उपोषन सुरु करण्यात आले आहे. 

एमआयटी या शिक्षण संस्थेच्या जगविख्यात घुमटामध्ये (डोम) विविध विचारवंचाचे चोपन्न पुतळे उभारण्यात आले आहेत. या घुमटाचे तीन महिन्यांपुर्वी उपराष्ट्रपती वेंकैया नायडु व मुख्यमंत्री व देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले होते. उदघाटन कार्यक्रमापुर्वी या घुमटात 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचा पुतळा उभारावा या मागणीसाठी स्थानिक युवकांनी आंदोलनही केले होते. मात्र तीन महिन्यानंतही पुतळा उभारणीसाठी संस्थेकडुन हालचाली होत नसल्याने, 'छत्रपती शिवराय सन्मान कृती समिती' च्या वतीने चक्री उपोषन करण्याचा इशारा दिला होता. 

उपोषनाबद्दल भुमिका मांडताना छत्रपती शिवराय सन्मान कृती समिती'चे मुख्य समन्वयक व राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे म्हणाले, ''एमआयटी या शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये (डोम) 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचा उभारण्यासाठी 'छत्रपती शिवराय सन्मान कृती समिती'च्या माध्यमातुन मागील सहा महिन्यांपासुन प्रयत्न सुरु आहेत. लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी एमआयटी संस्थेचे कार्यंकारी संचालक मंगेश कराय व 'छत्रपती शिवराय सन्मान कृती समिती'च्या कार्य़कर्त्यामध्ये दोन महिन्यांर्वी समेट घडवुन आणण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मंगेश कराड यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा संस्थेच्या आवारात उभारण्या संदर्भात होकारही दिला होता. मात्र पुतळा हा घुमटामध्येच हवा अशी कृती समितीची मागणी आहे. या मागणीसाठी मंगळवारपासुन चक्री उपोषन सुरु करण्यात आले आहे. 

यावेळी राष्ट्रवादी ग्राहक सरक्षंण समितीचे प्रदेशाध्यक्ष सुर्यकांत गवळी, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष शिवदीप उंद्रे, दिलीप भोसले, रणधिर घोरपडे, दयानंद भुसे, सुनिल उंद्रे, नवनाथ धुमाळ, गणेश शिंदे, हरीष गोटे, अमोल भोसले आदी उपस्थित होते. 

 

Web Title: Fasting due to not building statue of Shivaji Maharaj in MIT