धनगर समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी उपोषण

मिलिंद संगई
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

बारामती: धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज (शुक्रवार) पुण्यातील विधानभवनापुढे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाप्रमाणेच आता धनगर बांधवही आपल्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करणार आहेत. येत्या 8 सप्टेंबरपर्यंत सर्व मागण्या मान्य न झाल्यास चौंडी येथे धनगर समाजाच्या वतीने महामेळावा घेण्यात येणार आहे.

आज झालेल्या लाक्षणिक उपोषणास विश्वास देवकाते, रामराव वडकुते, रमेश शेंडगे, बाळासाहेब गावडे, रामदादा गावडे, मदनराव देवकाते, बाळासाहेब करगळ, सुभाष खेमणार, किशोर मासाळ, शशिकांत तरंगे यांच्यासह अनेक प्रमुख उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडून या बाबत वेळोवेळी आश्वासने दिली जातात, प्रत्यक्ष कार्यवाही काही होत नसल्याने आज पुण्यात विधानभवनाबाहेर उपोषण करुन सरकारला इशारा देण्यात आला आहे. धनगर समाज हा घटनेने दिलेल्या अधिकारानुसार अनुसूचित जमातीत असतानाही अन्याय होत असून विविध मागण्या मान्य होत नसल्याची तक्रार धनगर बांधवांकडून केली गेली.

सरकारला जो पर्यंत जाग येत नाही तो पर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.

Web Title: Fasting for various demands on behalf of Dhangar community