सोडून दिलेल्या पत्नीसोबत लग्न केल्याच्या रागातून तिघांवर जीवघेणा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

अल्ली याचे लग्न झाले होते. मात्र, लग्नानंतर भांडणे झाल्याने त्याने पत्नीला सोडून दिले होते. दरम्यान, यानंतर फिर्यादी बाजीराव इराणी याने त्याच्या पत्नीसोबत विवाह केला होता. त्याचा राग अल्लीच्या मनात होता.
 

पुणे :  सोडून दिलेल्या पत्नीसोबत लग्न केल्याच्या रागातून टोळक्‍याने एका महिलेसह तिघांवर धारदार शस्त्राने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना वाकडेवाडी परिसरामध्ये घडली. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी बाजीराव हैदर शफा इराणी (वय 24) यांनी फिर्याद दिली. त्यावरून अल्ली अब्बास शौकत इराणी याच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अल्ली याचे लग्न झाले होते. मात्र, लग्नानंतर भांडणे झाल्याने त्याने पत्नीला सोडून दिले होते. दरम्यान, यानंतर फिर्यादी बाजीराव इराणी याने त्याच्या पत्नीसोबत विवाह केला होता. त्याचा राग अल्लीच्या मनात होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिर्यादी व त्याचे नातेवाईक शुक्रवारी दुपारी बोलत बसले होते. त्यावेळी आरोपी व त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर कोयते व इतर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत फिर्यादीच्या हाताची बोटे तुटली तर, फिर्यादीची मावशी व मामाच्या मुलाच्याही डोक्‍यात धारदार शस्त्रांनी वार करून त्यांना जखमी करण्यात आले.

'क्षमता नसेल, तर ऑफलाइन परीक्षा घ्या'; अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला घेतले फैलावर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fatal attack on three out of anger over marriage with abandoned wife

Tags
टॉपिकस
Topic Tags: