सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या

संदीप घिसे 
बुधवार, 20 जून 2018

पिंपरी : सुनेने दिलेल्या त्रासाला कंटाळून सासू-सासऱ्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारा दरम्यान बुधवारी (ता. २०) सासऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना चाकण येथे १२ जून रोजी येथे घडली. सुनेवर गुन्हा दाखल करून तिला अटक केल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी घेतली. यामुळे पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात तणाव निर्माण झाला.

अनिल चिमाजी धोत्रे (वय ४६,रा. चाकण) असे आत्महत्या केलेल्या सासऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत धोत्रे यांच्या सुनेने पनवेल पोलिस ठाण्यात विवाहितेच्या छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. 'या गुन्ह्यामध्ये तुम्ही जामीन घ्या अन्यथा तुमच्यावर कारवाई करावी लागेल,' असे चाकण पोलिसांनी धोत्रे दाम्पत्याला सांगितले.

त्यामुळे घाबरलेल्या अनिल धोत्रे व शांता धोत्रे यांनी १२ जून रोजी विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान अनिल यांचा बुधवारी सकाळी सातच्या सुमारास मृत्यू झाला. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सुनेवर गुन्हा दाखल करावा. तसेच तिला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी घेतली. सकाळ पासून ते दुपारी चार वाजेपर्यंत मृतदेह वायसीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे.

Web Title: father and law committed suicide