बालिकेला पायाने रगडणाऱ्या बापाला अटक 

crime_wome.jpg
crime_wome.jpg

पुणे : कडेवर येण्यास नकारत रडणाऱ्या अडीच वर्षांच्या बालिकेला पित्याने मारहाण करून पायाने जमिनीवर रगडल्याची धक्कादायक घटना ताडीवाला रस्ता परिसरात घडली. यात ही बालिका गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी ताडीवाला रस्त्यावर राहणाऱ्या 39 वर्षीय पित्याला अटक केली आहे.

बालिकेच्या आईने फिर्याद दिली आहे. घटनेच्या दिवशी ही चिमुरडी आई-वडिलांसोबत खरेदीला गेली होती. पत्नीच्या हातात बाजाराच्या पिशव्या असल्याने आरोपीने मुलीला उचलून कडेवर घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिलांकडे जाण्यास नकार देत ती रडू लागली. हा प्रकार पाहून रस्त्यावरील लोक त्याच्याकडे पाहून हसले. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने घरी आल्यानंतर मुलीला किचनमध्ये कोंडले व तिला हाताने मारण्यास सुरवात केली. मुलीची आई "तिला मारू नका' अशी विनंती करीत असताना त्याने मुलीला कपडे धुण्याच्या खडबडीत ठिकाणी आपटले व तिच्या अंगावर पाय ठेवून जमिनीवर रगडले. त्यानंतर तिला पाण्यात बुडविले. मुलगी बेशुद्ध पडल्याचे पाहून त्याने तिला आईकडे दिले. त्या वेळी तिचे कपाळ, गाल, ओठ आणि पाठीतून रक्त येत होते.

मुलीच्या आईने तिला रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती केल्यानंतर आरोपी तिला जवळच्या खासगी रुग्णालयात घेऊन गेला. तेथे तिच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. मात्र पुढील उपचार न करता तो तिला पुन्हा घरी घेऊन आला व सोडून निघून गेला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. आरोपीला न्यायालयाने 25 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलिस निरीक्षक आर. व्ही. शेवते तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com