अल्पवयीन मुलाकडून मोशीत वडिलांचा खून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

पिंपरी - वडील घरात सतत भांडण करीत असल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केल्याची घटना मोशीत घडली. ईश्‍वर सोमनाथ बदनाळे (वय 40, रा. शिवाजीवाडी, मोशी) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी घरमालक सुजित दत्तात्रेय सस्ते यांनी फिर्याद दिली आहे.

मोशी-आळंदी रस्त्यावरील हवालदार वस्ती येथील श्रीनाथ कन्स्ट्रक्‍शन या बांधकाम साइटसमोर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास बदनाळे यांचा मृतदेह आढळला. शवविच्छेदन केल्यानंतर गळा आवळून खून केल्याचे समोर आले. त्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी केलेल्या तपासात बदनाळे यांच्या अल्पवयीन मुलानेच खून केल्याचे उघडकीस आले. बदनाळे हे घरात सतत भांडण करायचे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारासदेखील त्यांनी घरात भांडण केले. यामध्ये त्यांनी पत्नीसह मुलालादेखील मारहाण केली. या रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केला. तसेच मृतदेह हवालदार वस्ती येथे टाकला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father murder by son in moshi