चार महिन्याच्या बालकाला जमिनीवर आपटले

संदीप घिसे 
बुधवार, 2 मे 2018

दत्ता अनिल देशमुख (वय ३४, रा. भारतनगर पिंपरी) असे अटक केलेल्या पित्याचे नाव आहे. शुभांगी दत्ता देशमुख (वय २२ रा. लक्ष्मी हॉल, आंबेडकर नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरी : पत्नीने पैसे मागितल्याच्या कारणावरून जन्मदात्या पित्यानेच आपल्या चार महिन्यांच्या मुलाला जमिनीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना पिंपरी येथे घडली.

दत्ता अनिल देशमुख (वय ३४, रा. भारतनगर पिंपरी) असे अटक केलेल्या पित्याचे नाव आहे. शुभांगी दत्ता देशमुख (वय २२ रा. लक्ष्मी हॉल, आंबेडकर नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.३०) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास शुभांगी यांनी आपले पती दत्ता यांच्याकडे घरखर्चासाठी पैसे मागितले. मात्र दारू पिण्यासाठी पैसे हवे असल्याने पतीने पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून पती पत्नीमध्ये भांडण झाले.

चिडलेल्या पतीने पत्नीच्या हातात असलेल्या मुलाला हिसकावून जमिनीवर आपटून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या त्या बालकावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रामदास मुंढे करीत आहेत.

Web Title: father trying killed son in Pimpri