पोलिसांनी मुलाला मारहाण केल्याने वडिलांचा धक्क्याने मृत्यू

बाबा तारे
सोमवार, 7 मे 2018

पुणे - मुलाला चौकशीसाठी पोलिस चौकित आणून त्याला वडिलांसमोर पट्ट्याने मारहाण करत असतांना धक्का सहन न झाल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जनवाडी पोलिस चौकीत रविवारी रात्री घडली. मोरेश्वर काळूराम मेंगडे (वय 61 वर्षे) रा.1130 गोपाळ कृष्ण मंदिराजवळ गोखले नगर असे या मुलाच्या वडिलांचे नाव आहे. या प्रकरणी मुलाने पोलिसांना जबाबदार धरले असून, पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा धक्का बसल्यानेच वडिलांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्याने केला आहे.

दोन दिवसापुर्वी मोरेश्वर यांचा मुलगा अमोल मोरेश्वर मेंगडे(वय34) हा कुटूंबासह जात असतांना संदिप शुक्ला नावाच्या व्यक्तीने दारूच्या नशेत अमोलच्या अंगावर चारचाकी गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यात अमोलचे व त्याचे भांडण झाले. यावेळी मारहाणीत शुक्लाच्या डोळ्याला थोडा मार लागला. त्या रात्री शुक्ला घरी गेला व दुस-या दिवशी त्याने जनवाडी पोलिस चौकीत मारहाण झाल्याची तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी रविवारी रात्री आठ वाजता अमोल यास चौकित बोलावून घेतले. चौकशीसाठी बोलावून घेतल्यामुळे त्याचे वडिलही मागोमाग चौकित आले. त्यांच्या समोरच अमोलला पोलिसांकडून पट्ट्याने बेदम मारहाण केली जात होती. पोलिसांनी अशाप्रकारे बेदम मारहाण करू नये म्हणून मोरेश्वर मेंगडे जवळ गेले असता पोलिसांनी त्यांनाही शिव्या देऊन बाहेर काढले व त्यांना हा धक्का सहन न झाल्याने ते चौकितच चक्कर येऊन पडले व यातच त्यांचा मृत्यु झाल्याचा आरोप अमोल मेंगडे यांनी केला आहे. 

तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरेश्वर यांना फक्त बाहेर जाण्यास सांगितले होते. परंतु त्यांना आधीच आजार असल्याने चक्कर येऊन त्यांचा मृत्यू झाला. तर मुलगा अमोल यांनी याविषयी बोलताना सांगितले की पोलिस याप्रकरणी दिशाभूल करत असून वडिलांना कुठलाही आजार नव्हता. तसेच झाल्या प्रकाराची चौकशी करून वडिलांच्या मृत्युस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली आहे. परंतु, आतापर्यंत त्याची दखल घेतली नसल्याचेही त्याने सांगितले. हा सर्व प्रकार रविवारी रात्री सव्वा आठच्या दरम्यान घडला.

Web Title: The father was shocked because son assault by the police