संशोधकांची वसतिगृहे सुरू करण्यास अनुकूल

विद्यापीठातील वसतीगृहांबाबत उदय सामंत यांची माहिती
Uday Samant
Uday Samantsakal

पुणे : पुढील शैक्षणिक वर्षासाठी कोरोनासंबंधी काळजी घेत महाविद्यालयेच सुरू करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही संशोधक विद्यार्थ्यांची वसतिगृहे सुरू करण्यात हरकत नाही. यासंबंधी विद्यापीठाने प्रस्ताव पाठवावा, जेणेकरून जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची परवानगी मिळवता येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत दिली. (Pune News)

पुण्यात श्रमिक पत्रकार संघात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यासंबंधी सकाळनेही २९ जुलैला वृत्त प्रसिद्ध करत विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची समस्या मांडली होती. शहरातील राष्ट्रीय संशोधन संस्थांची वसतिगृहे संशोधक विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विद्यापीठाचे वसतिगृहे अजूनही संशोधकांसाठी बंद आहे.

Uday Samant
मराठा आरक्षण: '५० टक्क्यांच्या मर्यादेसह १०२ वी घटनादुरुस्ती निरुपयोगी'

त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर प्रवास आणि संशोधनातील इतर अडचणीही वाढल्या आहेत. त्या आधारेच सामंत यांच्याकडे विचारणा करण्यात आली. सामंत म्हणाले,‘‘विद्यापीठात कोरोनाची काळजी घेत संशोधक विद्यार्थ्यांची वसतिगृहे सुरू करण्यास हरकत नाही. वसतिगृह कसे वापरणार, विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा होणार नाही यासंबंधीच्या उपाययोजना काय, प्रवेश कसे देणार आदी संबंधीचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर करायला हवा. जेणेकरून जिल्हाधिकाऱ्यांना सांगून परवानगी देता येईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com