गुटखा जागेवरच ठेवून अधिकारी का परतले?

FDA officials returned without action
FDA officials returned without action

दौंड - दौंड शहरात पोलिसांनी एका कारवाईत १ लाख ७८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) अधिकारी दौंड पोलिस ठाण्यात येऊनही कारवाई न करता निघून गेले. 

दौंडचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या विशेष पथकाने बुधवारी (ता. १३) दुपारी दौंड-गोपाळवाडी रस्त्यालगत गोल्डन जनरल स्टोअर्समध्ये छापा टाकून ही कारवाई केली. छाप्यात दुकानाशेजारील गोदामातून १ लाख ७८ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला.

या प्रकरणी गुटखा विक्रेता नरेश खियालदास रोहिडा (वय ५१, सध्या रा. सरपंच वस्ती, दौंड) यास ताब्यातही घेण्यात आले. कारवाईत हवालदार संदीप जाधव, सुरेंद्र वाघ यांच्यासह स्वप्नील अहिवळे, विशाल जावळे, शर्मा पवार यांनी भाग घेतला. अन्न व औषध प्रशासन विभागाला पुढील कारवाईबाबत पोलिसांनी कळविले. त्यानुसार गुरुवारी (ता. १४) सकाळी अन्न सुरक्षा अधिकारी दौंड पोलिस ठाण्यात आले. जप्त केलेल्या मालाची पाहणी किंवा त्यासंबंधी चौकशी न करता त्यांनी तातडीचे काम आल्याने व प्रलंबित कामे असल्याने जात असल्याचे सांगितले. गुटख्यासंबंधी आमच्या कार्यालयास पत्र द्या, असे सांगून कारवाई न करताच पाटील निघून गेले, अशी नोंद दौंड पोलिसांनी केली आहे.  

गुटखा विक्रेता नरेश रोहिडा याला चौकशी करून सोडून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त केलेली गुटख्याची पोती दौंड पोलिस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com