पुणे : तुम्ही दुकानातून आटा, रवा, मैदा, सुजी घेताय? मगं जरा त्याच्या पॅकिंगवरील लेबल व्यवस्थित बघा. त्यावर "बेस्ट बिफोर' आहे का, पोषण मूल्य नमूद केलंय का हे आवर्जून बघा. कारण, यात दोष आढळणाऱ्या तसेच, स्वच्छतेचे निकष पायदळी तुडवडणाऱ्या फ्लोअर मिलवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातून तीन फ्लोअर मिलला टाळे ठोकले असून, तीनला सुधारणा नोटीस बजावली आहे.
भोसरी "एमआयडीसी'तील बॉंम्बे डाळ अँण्ड बेसन मिल याला "स्टॉप ऍक्टिव्हिटी'ची सांगितली असून, बारामती येथील जय मल्हार फ्लोअर मिल, हडपसर येथील पूना हाल अँण्ड बेसन मिल आणि मरकळ येथील रामप्रसाद रोलर अँण्ड फ्लोअर मिल यांना सुधारणा नोटीस बजावली आहे. मिलमध्ये स्वच्छता नसणे, लेबल दोष असल्याची माहिती एफडीएचे सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.