आयटीतील उद्याेगांवर एफडीएची नजर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

पुणे - राज्य सरकार आणि महापालिकेच्या सवलती घेऊन आयटी पार्कमध्ये बेकायदा हॉटेल आणि क्‍लब थाटणाऱ्यांवर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाची नजर राहणार आहे. विनापरवाना हॉटेलचा शोध घेऊन त्यांना दंड ठोठावण्याची तयारी विभागाने केली असून, महापालिकेच्या सहकार्याने पाहणी करून ही कारवाई करण्यात येणार आहे. विशेषत: बाणेर-बालेवाडी, कोरेगाव पार्क, खराडी आणि चंदननगरमध्ये ही मोहीम राबविण्याचे नियोजन ‘एफडीए’ने केले आहे. 

पुणे शहर आणि परिसरातील खासगी आयटी पार्कचा आयटीऐवजी हॉटेल्स, क्‍लब आणि अन्य कारणांसाठी वापर होत असल्याचे उघड झाले आहे.

विविध भागातील ७३ पैकी २६ आयटी पार्कमध्ये हे उद्योग सुरू आहेत. मात्र, संबंधित यंत्रणांकडून कारवाई होत नसल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर महापालिकेआधी ‘एफडीआय’ने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. नव्या आयटी धोरणानुसार (२०१५) आयटी पार्कसाठी तीन ‘एफएसआय’ दिला जातो. त्यात, आयटीसाठी ६० आणि अन्य कारणांसाठी ४० टक्के जागा वापरता येते. तसेच, महापालिका व्यावसायिकऐवजी निवासी दराने मिळकतकर आकारण्यात येतो. परंतु, या सवलती लागू झाल्यानंतर आयटी पार्कचा हॉटेल, क्‍लब आणि अन्य मनोरंजनासाठी वापर करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळून आले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर येथील हॉटेल आणि क्‍लबसाठी ‘एफडीआय’ची परवानगी आहे का, याची खातरजमा करण्यात येणार असून, त्यासाठी अशा आयटी पार्कची पाहणी करण्यात येणार आहे. महापालिकेकडील माहितीचा आधार घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे ‘एफडीआय’च्या सहायक आयुक्त अपर्णा भोईटे यांनी सांगितले. 

आयटी पार्कमध्ये विनापरवाना हॉटेल आणि क्‍लब सुरू असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याआधी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात येईल. परवाना नसलेल्या हॉटेल व्यवस्थापनाला दंड आकारून नोटिसा बजाविण्यात येतील. 
- अपर्णा भोईटे, सहायक आयुक्त, एफडीआय

पुणेकरांच्या प्रतिक्रिया
आयटीमध्ये कमी पगारात आणि कॉन्ट्रॅक्‍टवर कामावर घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नोकरीची हमी नसते. प्रत्यक्षात पगारवाढ होत नाही आणि समजा झाली, तर खूप कमी पगारवाढ होते. 
- दीपक चव्हाण 

हॉटेल आणि क्‍लब ताबडतोब बंद करून टाका. वाट कसली बघता आणि पाहणीची नाटकेपण नकोत. 
- प्रमोद

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम निरीक्षक, पुणे महापालिका, एमआयडीसी यांनी पंचतारांकित हॉटेल्स व क्‍लब यांना आयटी पार्कमध्ये मान्यता देताना नियम धाब्यावर बसवू नयेत. नोंदणीकृत आस्थापनांची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे.
- मयूर कदम

आयटी क्षेत्रात कित्येक ठिकाणी हॉटेल आणि क्‍लब सर्रास चालवले जातात. या समस्येमुळे आयटी क्षेत्राच्या विकासावर खूप परिणाम होईल. 
- अभिषेक मुथाळ
 
आयटी पार्कमध्ये हॉटेल्स, क्‍लब सुरू असल्याचे उघड.
- सचिन बदे

बऱ्याच छोट्या इमारती आहेत ज्यांना आयटी पार्क म्हणून परवानगी मिळाली आहे; पण त्यात एकही आयटी कंपनी नाही. आयटी कंपनीच्या सवलती आता काढून घ्याव्यात किंवा कमी कराव्यात. 
- सुजित पाटील

Web Title: FDA watch on IT business sakal impact