पुण्यात आज दुकाने बंद; व्यापारी महासंघ आणखी 1 दिवस वाट पाहणार

Decision to open shops in Pune postponed for 1 day
Decision to open shops in Pune postponed for 1 day

पुणे : दुकाने उघडल्यावर पोलिसांनी खटले भरल्यास व्यापारी महासंघ जबाबदारी घेणार नाही, असे स्पष्टीकरण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सोमवारी पहाटे केले. त्यामुळे शहरातील दुकाने उघडण्यावर व्यापाऱ्यांमध्ये दुमत असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान आज दुकाने उघडण्याचा निर्णय १ दिवसापुरता स्थगित केला  असल्याची माहिती पुणे व्यापारी महासंघाने केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे राज्य सरकार आणि महापालिकेने शहरातील दुकाने 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. पुणे व्यापारी महासंघाने या निर्णयाला विरोध केला आणि सोमवारपासून दुकाने उघडण्याचा इशारा दिला होता. मात्र पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला व्यापाऱ्यांशी चर्चा करण्याचा आदेश दिला. त्यानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे आणि पुणे व्यापारी महासंघाची बैठक रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सुरू झाली. ही बैठक रात्री साडेनऊच्या सुमारास संपली.

हेही वाचा - VIDEO: फक्त VIP नाच ट्रीटमेंट आहे का? रेमडेसिव्हीरसाठी पुण्यातील महिलेचा हंबरडा

त्यामध्ये प्रशासनाने व्यापाऱ्यांनी दुकाने उघडू नये राज्य सरकारच्या सुधारित आदेशाची वाट पहावी, असे आवाहन केले मात्र व्यापाराचे मोठे नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते, तसेच लॉकडाऊन सरसकट असावा अशीही भूमिका व्यापारी महासंघाशी संलग्न असलेल्या संघटनांनी मांडली. या शिष्टमंडळात महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया तसेच प्रवीण शहा, अजित सांगळे, कुमार शेट्टी यांच्यासह संलग्न संस्थांचे प्रतिनिधी आदी 14 जणांचा या शिष्टमंडळात समावेश होता. प्रशासनाबरोबरची बैठक झाल्यानंतर महासंघाने रात्री साडेदहा वाजता सदस्य व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी झूम कॉलवर बैठक आयोजित केली, ही बैठक पहाटे पावणे तीन वाजेपर्यंत सुरू होती. त्यात दुकाने उघडण्या संदर्भात ठोस निर्णय झाला नाही.

हेही वाचा - पुण्यात रेमडेसिव्हिरसाठी 'कोन्ट्रोल रुम'; गरजूंना टोल फ्री क्रमांकावर संपर्काचं आवाहन

''सोमवारी व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करू'', असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते तसेच पालकमंत्री अजित पवार हे देखील याबाबत ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. या दोघांची बैठक झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ अशी भूमिका महासंघातर्फे मांडण्यात आली, मात्र काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी कोणी दुकाने उघडली आणि पोलिसांनी कारवाई केली व्यापारी महासंघ हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पुण्यातील दुकाने सोमवारी उघडली जातील की नाही याबाबत साशंकता आहे, तसेच राज्य सरकार 14 एप्रिलनंतर राज्यात सरसकट पूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता असल्यामुळे व्यापारी धास्तावले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com