esakal | बाळाच्या पोषणासाठी अनुदानाचा फायदा; शहरातील महिलांची भावना
sakal

बोलून बातमी शोधा

Pregnant Woman

लसीकरणासाठी सरकारी दवाखान्यात गेले. तिथेच पंतप्रधान मातृ वंदना योजनेचा अर्ज भरून घेण्यात आला. त्यानंतर दोनच आठवड्यात या योजनेतील पहिला हप्त्याचे दोन हजार रुपयांचे अनुदान थेट खात्यावर जमा झाले. या योजनेचे तीन हप्त्यात पाच हजार रुपये मिळाले. या पैशाचा उपयोग हा बाळाच्या पोषणासाठी झाला, अशी भावना वडगाव शेरी येथील गायत्री मुजुमदार यांनी व्यक्त केली. या अनुदानामुळे वेळेत लसीकरण आणि बाळाला पौष्टिक आहार देण्यासाठी फायदा झाल्याचे दीपाली कांबळे सांगत होत्या.

बाळाच्या पोषणासाठी अनुदानाचा फायदा; शहरातील महिलांची भावना

sakal_logo
By
गजेंद्र बडे

पुणे - लसीकरणासाठी सरकारी दवाखान्यात गेले. तिथेच पंतप्रधान मातृ वंदना योजनेचा अर्ज भरून घेण्यात आला. त्यानंतर दोनच आठवड्यात या योजनेतील पहिला हप्त्याचे दोन हजार रुपयांचे अनुदान थेट खात्यावर जमा झाले. या योजनेचे तीन हप्त्यात पाच हजार रुपये मिळाले. या पैशाचा उपयोग हा बाळाच्या पोषणासाठी झाला, अशी भावना वडगाव शेरी येथील गायत्री मुजुमदार यांनी व्यक्त केली. या अनुदानामुळे वेळेत लसीकरण आणि बाळाला पौष्टिक आहार देण्यासाठी फायदा झाल्याचे दीपाली कांबळे सांगत होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या चार वर्षात पुणे शहर व जिल्ह्यातील 1 लाख 55 हजार 566 गर्भवतींना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यानुसार सर्व गर्भवतींना मिळून आतापर्यंत 63 कोटी 35 लाख 5 हजार रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. पंतप्रधान मातृ वंदना योजना ही 1 जानेवारी 2017 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत फक्त पहिल्या अपत्याच्यावेळी गर्भवतींना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात येते.

दसरा स्पेशल : छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीची दररोज होणार देखभाल!

हे अनुदान टप्याटप्याने तीन हप्त्यात देण्यात येते. गर्भवतीची सरकारी रुग्णालयात 150 दिवसाच्या आत नोंदणी झाल्यानंतर 1 हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात येतो. दुसरा गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर दोन हजार रुपयांचा दुसरा तर, बाळाचा जन्म झाल्यानंतर दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता देण्यात येतो. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिला व तिचे पती यांचे आधार कार्ड, बॅंक खाते क्रमांकाचा पुरावा आणि सरकारी दवाखान्यात नोंदणी केल्याचे माता-बाल संगोपन कार्डचा छायाप्रत ही कागदपत्रे आवश्‍यक आहेत.

UPSC ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे डोळे विद्यापीठाच्या निकालाकडे; काय आहे कारण?

केंद्रीय महिला व बालकल्याण खात्यामार्फत यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. यासाठी देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी पुणे जिल्ह्याने आतापर्यंत 2 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मार्च 2021 पर्बत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे.
- प्रमोद काकडे, बांधकाम व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद, पुणे.

डीएसके प्रकरण : उलाढालीची कुंडली सादर करा; तपास यंत्रणेला कोर्टाने दिली शेवटची संधी​

लाभार्थी प्रतिक्रिया
जिल्ह्यातील आथिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी ही योजना खूप चांगली आहे. या अनुदानामुळे गर्भवतीचे आरोग्य चांगले राहण्यास आणि बाळाचे पोषण चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते.
- कीर्ती इंगळे (लाभार्थी), पुणे शहर.

शहर, जिल्ह्यातील लाभार्थी
- पुणे शहर --- 33, 591.
- पिंपरी चिंचवड --- 27, 273.
- ग्रामीण --- 94, 702.

वर्षनिहाय लाभार्थी संख्या
- जानेवारी ते मार्च 2017 --- 6, 037.
- मार्च 18 पर्यंत --- 24, 412.
- मार्च 19 पर्यंत --- 45, 072.
- मार्च 20 पर्यंत --- 65, 362.
- एप्रिल ते ऑक्‍टोबर 20 पर्यंत --- 15, 079.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top