पुणे - दापोडी येथे मातृदिनानिमित्त मातांचा गौरव

रमेश मोरे 
शनिवार, 12 मे 2018

दापोडी (पुणे) : जागतिक मातृदिनानिमित्त दापोडी येथे कै. पांडुरंग धोंडीबा माकर प्रतिष्ठान पिंपळे निलख व कै. शांताराम बाईत प्रतिष्ठान यांच्या वतीने दापोडी येथील जेष्ठ नागरीक सभागृहात कै. चंद्रभागा भोसले यांचे स्मरणार्थ आई गौरव पुरस्काराने मातांचा गौरव करण्यात आला.

उद्योजक विश्वजित पाटील सामाजिक कार्यकर्ते मदन कोठुळे यांचे शुभहस्ते कमल काटे, सरस्वती काटे, मुक्ताबाई शेळके, योगिनी निंबाळकर यांना शाल श्रीफळ व मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी सतीश पाटील, नगरसेवक रोहित आप्पा काटे, समिर शेख, अमोल काटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक माकर, रविंद्र बाईत, श्रीकांत इबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्योजक विश्वजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले, प्रत्येक मुलांनी आपल्या वयोवृद्ध आईवर आईनी स्वतःच्या बालपणी जसे आपले संगोपन व प्रेम केले तसे मुलांनी आईवर प्रेम करावे. आई वडीलांना वृद्धाश्रमात पाठवु नये. कै. पांडुरंग माकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक माकर म्हणाले, माता पित्यांनी विरंगुळा केंद्रात न जाता आपल्या लहान मुलाबरोबर वेळ घालवावा. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माधुरी बाईत यांनी केले. तर आभार दत्तात्रय भोसले यांनी मानले.

Web Title: felicitate mothers on mother s day