भरणेवाडीमध्ये चार पोलिस उपनिरीक्षकांचा आमदार भरणे यांच्या हस्ते सत्कार

राजकुमार थोरात
रविवार, 1 जुलै 2018

वालचंदनगर : ग्रामीण भागातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन प्रशासनामध्ये अधिकारी होवून शेतकऱ्यांच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले.

वालचंदनगर : ग्रामीण भागातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन प्रशासनामध्ये अधिकारी होवून शेतकऱ्यांच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले.

इंदापूर तालुक्यातील प्रशांत रणवरे(निमसाखर), रोहिदास आेमासे (कळस), संजय साबळे (हिंगणगाव), विकास इंजे (पळसदेव) चार तरुणांची पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. भरणेवाडी (ता.इंदापूर) येथे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते चौघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भरणे यांनी सांगितले  २०१६ साली झालेल्या स्पर्धा परीक्षेचा नुकताच लागला अाहे. राज्यातील ७५० मुलांची पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली असून यामध्ये इंदापूर तालुक्यातील चौघां जणांची झालेली निवड कौतुकस्पद अाहे.

तालुक्यातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून प्रशासनामध्ये अधिकारी होण्याचा प्रयत्न करावा. ग्रामीण भागातील बहुतांश मुले शेतकऱ्यांची असून मुलांना शेतकऱ्यांच्या अडचणी माहित असल्याने त्यावरती मात करणे सोपे असल्याने शेतकऱ्यांसाठी  जास्तीजास्त मुलांनी स्पर्धापरीक्षाची तयारी करुन यश मिळविण्याचा प्रयत्न करावा.यावेळी कळसचे सरपंच गणेश सांगळे, पोलिस पाटील तुकाराम खाडे, विक्रमसिंह निंबाळकर उपस्थित होते.
 

Web Title: Felicitated by the staff of four police sub-inspectors at Furnewadi