जुनी सांगवीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

रमेश मोरे
मंगळवार, 10 जुलै 2018

जुनी सांगवी येथील पंचशील सोशल फाऊंडेशनच्या वतीने 'समता बुद्ध विहार' ममतानगर येथे दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील पंचशील सोशल फाऊंडेशनच्या वतीने 'समता बुद्ध विहार' ममतानगर येथे दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पंचशील सोशल फाऊंडेशन व पंचशील धम्मा ग्रुप यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ.आयरेकर म्हणाल्या, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी चिकाटीने शिकले पाहिजे. तरच स्वत:सह समाजाचे व देशहित साधता येईल. विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांच्या कष्टाची परिस्थितीची जाण ठेऊन शिकले पाहिजे.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मंगला इंजे (आयरेकर ), प्रा. गौतम पोरलेकर, अॅड. कु. प्रियंका कांबळे, किर्ती जमदाडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल किसन कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुणाल पाडुरंग गायकवाड यांनी केले. तर आभार जगदीश कांबळे यांनी मानले. सुधाकर रामफुले, कैलास गंगावने, शरद सपकाळ, विजय सोनवणे, संदी भंडारी, प्रा. शांतकुमार चिंचोलीकर यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Web Title: Felicitated topper students in sangvi