लाल किल्ला ते रायगड शिवज्योत आणणाऱ्या शिवभक्तांचा सत्कार

रमेश मोरे 
मंगळवार, 17 एप्रिल 2018

जुनी सांगवी (पुणे) : इच्छा शक्तीला कर्तुत्वाची जोड असेल तर जीवनात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. एखादी गोष्ट आपण ठरवली आणि त्याप्रमाणे कष्ट केले तर जीवनात कुठलीही गोष्ट असाध्य नाही. असेच काम सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथील धर्मवीर संभाजी मंडळाच्या बारा शिवभक्तांनी करून दाखवले आहे. त्यांनी नवी दिल्ली लाल किल्ल्यावरून सायकलवरून शिव ज्योत घेऊन दोनहजार किलो मीटरचा प्रवास केला आहे.

राजस्थान मध्यप्रदेश, दिल्लीच्या तापमानाचा सामना करत ही शिवज्योत पुण्यात सांगवीत पोचल्यावर येथील सातारा मित्रमंडळाचे अध्यक्ष शिवाजी माने व मंडळाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सातारा मित्र मंडळ सांगवी व कोपर्डे हवेली युवा मंच पुणेच्या वतीने त्यांचे पुण्यात जंगी स्वागत व सत्कार करण्यात आले.

नोकरी, शेती करणाऱ्या या शिवभक्त सायकलस्वारांनी प्रवासातील आपले अनुभव कथन केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महारांच्या स्वराज्य स्थापनेची प्रेरणा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य डोळ्यासमोर ठेवुन दिल्ली लाल किल्ला ते रायगड असा एकुण दोनहजार किमीचे अंतर पार करताना विविध भाषिक आम्हाला रस्त्यात भेटले, जगात कुठेही फिरा छत्रपती व छत्रपतींचा भगवा सोबत असल्यास माणसं भगव्याला नमन करतात. यावेळी धर्मवीर संभाजी मंडळाचे अध्यक्ष सिध्दनाथ चव्हाण, सदस्य अभिजित चव्हाण, लक्ष्मण साळवे, गोरख चव्हाण, अंकुश शिंदे, सचिन उदुगडे, गणेश साळवे, गणेश चव्हाण, नितीन तुपे, विक्रम चव्हाण, श्रीकृष्ण भोसले, अनिकेत गोसावी या बारा मावळ्यांचा जाहीर सत्कार करण्यांत आला.

यावेळी पश्चिम महाराष्ट युवा मंच पुणे अध्यक्ष रमेश चव्हाण व उद्योजक अशोक पाटील, सातारा मित्र मंडळाचे संजय उर्फ आबा चव्हाण, प्रकाश पाटील, सोमनाथ कोरे, विजय यादव, जावेद फरास, प्रकाश घोरपडे, सूर्यकांत ढाणे, लहू शिंदे धनाजी जाधव सर्व सातारा मित्र मंडळाचे सदस्य व कोपर्डे हवेली युवा मंचाचे सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.संतोष नवले यांनी  केले. प्रस्ताविक सोमनाथ कोरे यांनी केले, तर आभार विजय यादव यांनी मानले.
 
Web Title: felicitating shivabhakt who carry shivjyot from laal killa to raigad