जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

रमेश मोरे
सोमवार, 25 जून 2018

जुनी सांगवी - सांगवी येथील जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने १० वी व १२ वीच्या परिक्षेत ८० ते ९७ टक्के गुण संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून सत्कार समारंभाची सुरूवात करण्यात आली. विद्यार्थी-पालकांना पेढे भरवुन आनंद व्यक्त केला. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणुन शिक्षिका कल्पना शेरे,  उद्योजिका वैशाली शर्मा, पुष्पा पाटिल, मुख्याध्यापक शिवाजी माने.संतोष नवले आदी मान्यवर उपस्थित होते.

 याचबरोबर जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने महानुभाव श्रीकृष्ण आश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

सांगवी येथील महानुभाव श्रीकृष्ण मंदिर आश्रमात राहणा-या साक्षी महानुभाव, प्रणाली महानुभाव, यश महानुभाव व श्रद्धा महानुभाव या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष रविंद्र निंबाळकर यांनी केले. तर सुत्र संचलन अशोक भोसले यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी बंडोपंत शेळके, वासुदेव मालतुमकर, आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Felicitation of meritorious students on behalf of Senior Citizens Union