नगरसेविकेची निलंबित एमआयएम नगरसेवकाविरुध्द बलात्काराची तक्रार 

crime_wome.jpg
crime_wome.jpg

चाकण : औरंगाबाद येथील एका नगरसेविकेने एका नगरसेवकाविरोधात बलात्काराची तक्रार चाकण पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी एमआयएमचे निलंबित नगरसेवक मतीन रशीद सय्यद (रा. टाऊन हॉल, आसेफिया कॉलनी, औरंगाबाद) याच्यावर बलात्कारप्रकरणी तसेच विनयभंग केल्याप्रकरणी नगरसेवकाचा भाऊ मोहसीन रशीद सय्यद, मेहुणा हमीद सिद्दिकी (दोघेही रा. औरंगाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. 

पीडित नगरसेविका सध्या चाकण, खराबवाडी (ता. खेड) येथे राहत आहे. हा प्रकार 26 नोव्हेंबर 2018 ते 24 फेब्रुवारी 2019 या कालावधीत घडला. मतीन याने तक्रारदार महिलेच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन चाकण येथे येऊन तिची आई आजारी आहे, असे खोटे सांगून नगरसेविकेला व तिच्या दोन मुलांना कारमध्ये बसवून खंडाळा येथे वॉटर पार्कवर नेले. तेथे तिला पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देऊन विनयभंग केला तसेच गुंगीचे औषध देऊन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला.
 

तक्रारदार महिलेच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आहेत. तसेच, आरोपी मतीन याचा भाऊ व मेहुणा यांनी औरंगाबादजवळील एका लॉजवर विनयभंग केला, असे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आरोपी नगरसेवक हा एका प्रकरणात सध्या तुरुंगात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com