पुणे : वाकडला बसच्या धडकेत डॉक्टर तरुणीचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

खासगी बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना वाकड येथे सोमवारी (ता.26) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. ऐश्वर्या गरगट्टे ( वय 26, रा. काटे वस्ती, पिंपळे सौदागर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

पिंपरी : खासगी बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना वाकड येथे सोमवारी (ता.26) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. ऐश्वर्या गरगट्टे ( वय 26, रा. काटे वस्ती, पिंपळे सौदागर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

ऐश्वर्या या जगताप डेअरी जवळील सावित्रीबाई फुले उद्यानासमोरील सिग्नलवरून यु टर्न घेऊन पिंपळे सौदागरच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी खासगी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्या उडून रस्त्यावर पडल्या. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने ऐश्वर्या यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेमुळे या मार्गावर काहीवेळ वाहतूककोंडी झाली होती. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Female Doctor dies due to hit by private bus crash at wakad in pune