फर्ग्युसनमध्ये आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

पुणे - पुण्यातील नामांकित महाविद्यालयातून शिक्षण घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून चंद्रपूरमधील प्राजक्ता मोळक ही विद्यार्थिनी शहरात आली. फर्ग्युसन महाविद्यालयात आणि तेथील वसतिगृहात तिचा प्रवेश निश्‍चित झाला. मात्र, असे असताना वसतिगृहाच्या अधीक्षकांनी प्रवेश नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थिनीचा प्रवेश नाकारणाऱ्या वसतिगृह अधीक्षकांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले आणि त्या विद्यार्थिनीला पुन्हा प्रवेश मिळवून दिला.

प्राजक्ताचे वडील मनोज मोळक म्हणाले, ‘‘प्राजक्ताचा प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर वसतिगृहाचे शुल्कही भरले. वसतिगृहात गेल्यानंतर तिचे सामान जड असल्याने मदतीसाठी सुरक्षारक्षकांकडे विनंती केली. मात्र त्यांनी ती नाकारली. मग, सामान खोलीत घेऊन जाण्यासाठी तिच्या आईला वसतिगृहात येण्याची परवानगी द्यावी, असे आम्ही सांगितले. मात्र, त्यालाही नकार दिला. वसतिगृह अधीक्षकांनी मुलीचा प्रवेश रद्द करत तिच्या खोलीला कुलूप लावण्याचा आदेश दिला.’’ 

या बाबत डॉ. परदेशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा मोबाईल बंद होता.

Web Title: fergusson college agitation